AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी रंगभूमीला मोठा दिलासा, कल्याण-डोंबिवलीतही नाट्यगृहांच्या भाड्यात 75 टक्के सूट

कोरोनाच्या कठीण काळात सिनेसृष्टीलाही मोठा फटका बसला आहे. यामुळे ठाणे महापालिकेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मराठी रंगभूमीला मोठा दिलासा, कल्याण-डोंबिवलीतही नाट्यगृहांच्या भाड्यात 75 टक्के सूट
| Edited By: | Updated on: Nov 26, 2020 | 5:55 PM
Share

कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका (Kalyan-Dombivali Municipal Corporation) हद्दीतील नाट्यगृहांच्या भाड्यात (theater rent) 31 मार्चपर्यंत 75 टक्के सूट देण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Vijay Suryavanshi) यांनी दिली आहे. यामुळे सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खरंतर, कोरोनाच्या कठीण काळात सिनेसृष्टीलाही मोठा फटका बसला आहे. यामुळे ठाणे महापालिकेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Great relief to Marathi theater 75 percent discount on theater rent in Kalyan Dombivali)

कोरोना काळात मार्च महिन्यापासून नाट्यगृहं बंद होती. यानंतर मर्यादीत क्षमतेनुसार नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली मात्र, नाट्यगृहांना आकारले जात असलेले भाडे जास्त आहे. कोरोना काळानंतर नाट्य संस्थांना हे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे नाट्यगृहांच्या भाड्यात सूट देण्याची मागणी नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी दोन दिवसापूर्वीच महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांची भेट घेतली होती.

यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं आयुक्तांनी गुरुवारी सांगितलं. महापालिका हद्दीत कल्याणमध्ये अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवली सावित्रीबाई नाट्यमंदिर आहे. या दोन्ही नाट्यगृहांच्या भाड्यात 31 मार्चपर्यंत 75 टक्के सूट दिली जाणार आहे. दरम्यान, नाट्यनिर्मात्यांना उभारी देण्यासाठी ठाणे महापालिकेनेही नाट्यगृहाचे भाडे 25 टक्के आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी याबद्दल माहिती दिली असून याबाबतचा आदेश महापालिका डॉ. विपीन शर्मा यांनी निर्गमित केला आहे. नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये सवलत देणारी ठाणे ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा फटका नाट्यनिर्मात्यांना देखील बसला आहे. राज्यशासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर नाट्यनिर्मात्यांनी महापालिकेच्या माध्यमातून मदत मिळणेबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या निवेदन सादर केले होते. या अनुषंगाने पालकमंत्रयांनी केलेल्या सुचनेनुसार महापौर यांनी नाट्यगृहाचे भाड्यामध्ये सवलत देण्याबाबतचे पत्र प्रशासनास दिले. (Great relief to Marathi theater 75 percent discount on theater rent in Kalyan Dombivali)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाट्यगृहामध्ये नाट्यप्रयोग सादर करताना शासनाने ठरवून दिलेल्‌या सर्व नियमांचे पालन नाट्यनिर्मात्यांनी करावयाचे आहे तसेच ही सवलत सर्व भाषेतील नाटकांच्या निर्मात्यांसाठी लागू राहील. मात्र, सामाजिक संस्था, कंपन्या, क्लब यांना ही सवलत लागू राहणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

इतर बातम्या –

नाट्यगृहाचे भाडे 20 ते 25 टक्केच घ्या, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची महापौरांकडे मागणी

Corona Virus : सरकारच्या आदेशाला केराची टोपली, नाशिकमध्ये नाट्यगृह सुरु

(Great relief to Marathi theater 75 percent discount on theater rent in Kalyan Dombivali)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.