AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा धुमशान, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस; चाकरमान्यांची त्रेधातिरपीट

गेल्या चार दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

चार दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा धुमशान, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस; चाकरमान्यांची त्रेधातिरपीट
mumbai rain Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2023 | 8:47 AM
Share

मुंबई : तब्बल चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून मुंबई, ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने सकाळपासूनच जोर धरल्याने संपूर्ण दाणादाण उडाली आहे. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तर त्रेधातिरपीट उडाली आहे. सुदैवाने अजूनही कुठेच पाणी तुंबल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. पावसामुळे रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच कुठेही वाहतूक कोंडी झालेली नाही.

मुंबई आणि उपनगरांत पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरीस लावली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि बदलापूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबई उपनगरातील सर्व भागात आता पाऊस पडत आहे. अंधेरी सबवेच्या जवळ मुसळधार पाऊस सुरु असून भुयारी मार्गात पाणी भरू लागले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास मिलन सबवेमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील इतर सखल भागातही पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चाकरमान्यांची त्रेधातिरपीट

दरम्यान, पहाटे पासूनच पावसाने धुमाकूळ घातल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागले. पाऊस आणि वारा यामुळे रस्त्यावरून चालताना अनेकांना भिजावं लागलं. तसेच मुसळधार पावसामुळे रिक्षाही वेळेत मिळत नसल्याने अनेकांना स्टेशनपर्यंत पायीच चालत जावं लागल्याने चांगलीच दमछाक झाली.

नवी मुंबईला झोडपले

नवीमुंबईतही सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. नवी मुंबईतील, सानपाडा, सीवूड दाराव्हे, खारघर, बेलापूर आणि खांदेश्वर या भागात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. नवी मुंबईसह पनवेल आणि रायगडमध्येही पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई, विरारमध्येही पावसाचा जोर

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसांच्या उघडीप नंतर आज पुन्हा पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात भात पेरणीला सुरूवात झाली आहे. वसई आणि विरार शहरात कुठेही पाणी साचले नसून सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे.

पाच दिवस पावसाचेच

दरम्यान, हवामान खात्यानेही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. तर मराठवाड्यासह इतर भागातही मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.