‘होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते’, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहर शहा यांचा दावा

होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि कोरोनाचा मुकाबला केला जाऊ शकतो (Homeopathy boosts the immune system), असा दावा होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहर शहा यांनी केला आहे.

'होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते', होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहर शहा यांचा दावा
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 5:36 PM

मुंबई : होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि कोरोनाचा मुकाबला केला जाऊ शकतो (Homeopathy boosts the immune system), असा दावा होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहर शहा यांनी केला आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी होमिओपॅथी हा उत्तम पर्याय असल्याचं आयुष मंत्रालयानेदेखील सांगितलं आहे. त्यानंतर मुंबईतील ‘वेलकम क्युअर’ संस्थेने मोफत होमिओपॅथी औषधे वाटण्यास सुरुवात केली आहे (Homeopathy boosts the immune system).

“‘वेलकम क्युअर’ संस्थेमार्फत जवळपास आठ हजार नागरिकांना होमिओपॅथी औषधे देण्यात आली आहेत. या आठ हजार व्यक्तींच्या अभ्यासातून त्यांच्यापैकी कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे होमिओपॅथी कोरोनाला पूर्णपणे बरं करु शकत नाही. मात्र कोरोना होण्यापासून वाचवू शकतं”, असा दावा डॉ. जवाहर शहा यांनी केला आहे.

“जगभराची एकूण लोकसंख्या ही 700 कोटी आहे. मात्र, त्यापेक्षाही जास्त व्हायरस, पॅसेसाईट्स, फंगाय आणि बॅक्टेरिया आपल्या शरीरात असतात. तरीदेखील आपल्याला त्रास होत नाही. कारण आपली रोगप्रतिकार क्षमता मजबूत असते. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता मजबूत असायला हवी. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी होमिओपॅथी हा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे. आयुष म्हणजे आयुर्वेदिक, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी. या सर्वांचं योग्य समन्वयसाधून औषध घेतलं आणि पथ्य पाडले तर रोगप्रतिकार क्षमता वाढेल”, असं डॉ. जवाहर शहा म्हणाले.

“मी गेल्या 45 वर्षांपासून काम करत आहे. मी आतापर्यंत श्वसनाचा विकार असणाऱ्या हजारो रुग्णांवर उपचार केला आहे. मी पूर्ण अभ्यास केला आणि औषधांची एक किट बनवली आहे. ही औषधे फक्त तीन दिवस घ्यायची आहेत. या औषधांचं आतापर्यंत आठ हजार पेक्षाही जास्त किटचं वाटप करण्यात आलं आहे”, असं डॉ. जवाहर शहा यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई, पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यापाठोपाठ सोलापूर, यवतमाळ, पिंपरी चिंचवड या ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनारुग्णांची संख्या वाढली आहे.

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे लागून असलेल्या जुहू गल्लीतील एका चाळीत तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या तिघांना नायर, नानावटी आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लालबागमध्ये सर्वेक्षण करताना चार आरोग्य सेविकांना कोरोनाची लागण झाली आहेत. त्याशिवाय एशियन रुग्णालयातील 31 कर्मचाऱ्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यात 8 नर्स आणि 23 बाहेरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

पाऊस तोंडावर, पण कापूस पडून, खरेदी न केल्यास 30 एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा

वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, बीएमसीने कारवाईचा बडगा उगारताच बंद नर्सिंग होम सुरु

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.