हॉस्टेलमधील बॅचलर मुलींना वाटते ‘या’ 6 गोष्टींची भीती; 2री आणि 5 वी भीती सर्वाधिक डेंजर
शिक्षण किंवा नोकरीसाठी मुली हॉस्टेलमध्ये राहतात. अनेक हॉस्टेलमध्ये सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतलेली असते. पण तरीही मुलींना मनातून कशाची ना कशाची भीती वाटत असते. त्यामुळे त्या सतत दडपणाखाली असतात.
मुंबई : अनेक मुली शिकण्यासाठी हॉस्टेलमध्ये राहत असतात. तर काही तरुणी पेइंग गेस्ट म्हणून राहत असतात. शिक्षण किंवा नोकरीसाठी या मुली हॉस्टेल किंवा पीजीचा आधार घेतात. सुरक्षितता मिळावी म्हणून त्या हा पर्याय निवडतात. मात्र, मुंबईतील एका हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीची सुरक्षारक्षकानेच हत्या केल्याची घटना घडल्याने या विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. साधारणपणे हॉस्टेल किंवी पीजीमध्ये राहणाऱ्या मुलींना सहा गोष्टींची भीती वाटत असते. काही मुलींच्या बोलण्यातून हे जाणवलं. मात्र, सर्वच ठिकाणी ही भीती नसते. काही ठिकाणी अत्यंत सुरक्षित वातावरण असल्याने त्यांना कशाचीच भीती नसते. मात्र, अपवादात्मक ठिकाणी काही गोष्टींची स्वाभाविकपणे भीती वाटत असते. त्या सहा गोष्टी कोणत्या? त्यावर टाकलेला हा प्रकाश.
सुरक्षेची भीती
हॉस्टेल किंवा पीजीमध्ये सुरक्षेची भीती वाटते. ज्या पीजी किंवा हॉस्टेलमध्ये सुरक्षारक्षक असतो तिथेही या मुलींना भीती वाटत असते. पीजीमध्ये राहणाऱ्या मुली तशा सुरक्षित असतात. पण आतमध्ये राहणाऱ्या लोकांशी पटत नसेल, वैर झालं असेल तर दगाफटका होण्याची त्यांना भीती असते. एखादी व्यक्ती 24 तास तुमच्यासोबत राहत असेल तर त्याला तुमची संपूर्ण माहिती असते. मात्र, तिच व्यक्ती तुमची वैरी बनली तर घात होऊ शकतो.
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना सीनिअरकडून धोका होण्याची शक्यता असते. कारण साधारणपणे सीनिअर लोक ज्युनिअरची रॅगिंग करतात. कधी कधी या रॅगिंगचा प्रकार भयानक असतो. त्यामुळे त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता असते.
अंडरगारमेंट्स चोरी होण्याची भीती
साधारणपणे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना कपडे चोरी होण्याची भीती वाटत असते. कपडे सोडा, त्यांचे अंडगारमेंट्सही चोरीला जात असतात. कधी कधी एखाद्या मुलीला टारगेट करून तिचेच कपडे चोरी होत असतात. आंबटशौकीनांकडून हा प्रकार होण्याची शक्यता अधिक असते. बंगळुरूत नुकताच एक प्रकार घडला. बंगळुरूच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये एक तरुण जबरदस्ती घुसला आणि त्याने मुलींचे अंडरगारमेंट्स पळवले होते.
नोकरांची भीती
पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींना नोकरांची भीती असते. एका पीजीमध्ये एक नोकर एका मुलीकडे एकटक बघत होता. मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने संबंधितांकडे तक्रार केली. नोकरानेही आपला गुन्हा कबूल केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही दिवसांपूर्वी पीजीमध्ये एका मुलीच्या रुममध्ये नोकर घुसला आणि त्याने अश्लील वर्तन केले. मात्र, त्याला लगेच पकडण्यात आलं होतं.
या शिवाय रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडूनही भीती असते. गर्ल्स हॉस्टेल किंवा पीजी असल्याचं सर्वांना माहीत असतं. त्यामुळे काही लोक या हॉस्टेल किंवा पीजीकडे पाहतच जात असतात.
गॉसिपची भीती
गॉसिपचीही तरुणींना भीती असते. कारण गॉसिपमुळे एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तिच्याकडे बघण्याचा चुकीचा दृष्टीकोण तयार होऊ शकतो. एखाद्या मुलीचं अफेअर असल्याच्या मुद्दाम वावड्या उठवल्या गेल्या तर ती मुलगी आयुष्यातून उठण्याची शक्यता असते. तिचं चारित्र्य हनन होतं. त्यामुळे संबंधित मुलगी डिप्रेशनमध्ये जाण्याचीही शक्यता असते.
लेस्बियनची भीती
आणखी एक भीती म्हणजे लेस्बियनची. एखाद्या मुलाने चुकीचा स्पर्श केला तर तो कळतो. त्यामुळे त्याची तक्रार करता येते. त्याच्यापासून दूर राहता येते. सावध होता येते. मात्र एखादी स्टॉकर मुलगी भेटली तर जोपर्यंत तुम्ही तिच्या वर्तनाचं निरीक्षण करत नाही तोपर्यंत तुमची हॅरेसमेंट होत असते. अशा मुली लेस्बियन असतात, त्यांच्यामुळे इतर मुलींनाही लेस्बियन होण्याची भीती वाटत असते.
एकटे पडण्याची भीती
साधारणपणे हॉस्टेलमध्ये मुलींचे ग्रुप असतात. मुली ग्रुप करून राहत असतात. बऱ्याच तरुणींना ग्रुप करून राहत नाहीत. त्यांना एकटं राहणं आवडतं. किंवा काही मुलींना ग्रुपमध्ये राहून खर्च करणं परवडत नाही. त्यामुळे त्या ग्रुपपासून वेगळ्या होतात. अशावेळी या मुलींना एकटं पडण्याची भीती असते.