Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर

IAS Aanchal Goyal Inspiring Story: आंचल गोयल यांचे पती निमित गोयल मुंबई पोलीस दलात डीसीपी आहे. ते 2014 के आयपीएस आहेत. आंचल गोयल यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ, मुंबई फिल्म सिटीच्या संयुक्त एमडी म्हणून काम केले आहे. त्या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस विभागात सहायक सचिव होत्या

कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर
IAS Aanchal Goyal
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 3:17 PM

IAS Aanchal Goyal Inspiring Story: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2014 बॅचच्या IAS अधिकारी आंचल गोयल यांना मुंबई शहराचे जिल्हाधिकारी केले आहे. मागील महिन्यात मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदली झाल्यानंतर हे पद रिकामे होते. त्यांच्या जागी आता आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंचल गोयल यांनी यापूर्वी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आगामी मुंबई मनपाच्या निवडणुका पाहता ही जबाबदारी खूप महत्वाची आहे. 2014 बॅचच्या IAS अधिकारी आंचल गोयल यांची बदली रद्द करण्यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये जनतेने जनआंदोलन केले होते. तेव्हापासून त्या चर्चेत आहेत. नागपूर मनपात त्यांनी केलेल्या कामांमुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिली आहे.

जनतेच्या आंदोलनामुळे राज्यभर चर्चा

ऑगस्ट 2021 मध्ये परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू झाल्यानंतर आयएएस अधिकारी आंचल गोयल यांनी पहिल्याच दिवशी कामाचा धडाका लावला होता. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी दीपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती केली होती.

गोयल परभणीत रुजू होण्यासाठी 27 जुलै रोजी आपल्या बाळासह परभणीत आल्या होत्या. परंतु त्यांना मुंबईत परत बोलवण्यात आले. यामुळे त्या पदभार न स्वीकारता परतल्या होत्या. परभणीकरांनी या निर्णयाविरूद्ध आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे राज्यभर हा विषय चर्चेत आला. अखेर तत्कालीन सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल राहणार असल्याचे स्पष्ट केले, त्यानंतर परभणीकरांचे आंदोलन थांबले होते.

हे सुद्धा वाचा

आंचल गोयल यांचे पती निमित गोयल मुंबई पोलीस दलात डीसीपी आहे. ते 2014 के आयपीएस आहेत. आंचल गोयल यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ, मुंबई फिल्म सिटीच्या संयुक्त एमडी म्हणून काम केले आहे. त्या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस विभागात सहायक सचिव होत्या. 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या आंचल गोयल यांचे शिक्षण चंडीगडमध्ये झाले. त्यांनी बीई (इलेक्ट्रॉनिक्स) केले.

हे ही वाचा…

रिल बनवणाऱ्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितले…

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.