समुद्रातून बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करताना दोन बोटी जप्त; 11 लाखाचे डिझेल घेतले ताब्यात

मुंबईतल्या येलो गेट पोलिसांनी समुद्रामध्ये मोठी कारवाई करत गुजरात मार्गे डिझेलचा बेकायदेशीर साठा करून येत असलेल्या दोन बोटी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बोटींचे खलाशी असलेले दोन आरोपी सध्या पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत

समुद्रातून बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करताना दोन बोटी जप्त; 11 लाखाचे डिझेल घेतले ताब्यात
गुजरामधून होणाऱ्या बेकायदेशीर डिझेलची वाहतुकीवर कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:06 PM

मुंबईः मुंबईतल्या येलो गेट पोलिसांनी समुद्रामध्ये मोठी कारवाई करत गुजरात मार्गे डिझेलचा बेकायदेशीर साठा (Illegal stocks diesel) करून येत असलेल्या दोन बोटी जप्त (boats seized) केल्या आहेत. याप्रकरणी बोटींचे खलाशी असलेले दोन आरोपी सध्या पोलिसांच्या (Police) कोठडीमध्ये आहेत तर दोन्ही बोटींचा मालक असलेल्या व्यक्तींविरोधातसुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोर्ट झोनच्या डीसीपी गीता चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते वीस दिवसांपूर्वी या दोन्ही बोटी समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्या गुजरातच्या हद्दीत जाऊन तिथून हे डिझेल त्यांनी विविध ड्रमच्या माध्यमातून बोटीमध्ये भरले होते.

त्यानंतर त्यांनी ते मुंबईच्या दिशेने घेऊन येत असताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 11 लाख किंमतीचे 11 हजार लिटर इतके डिझेल अवैधरित्या बोटींमध्ये साठवून ठेवलेले आढळून आले. याप्रकरणी दोन बोटी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून यामध्ये आणखी कोण कोण आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. समुद्रमार्गी डिझेलची अवैधरित्या वाहतूक होत असल्याने याचा कसून तपास सुरु आहे.

मच्छीमारीसाठी गेले होते समुद्रात

समुद्रात या दोन्ही बोटी वीस पंचवीस दिवसापूर्वी मच्छिमारी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यानी गुजरातमधून येत असताना बोटीमध्ये डिझेलचे ड्रम भरले होते. ते घेऊन येत असताना पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळाली, त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येलो गेट पोलिसांच्या माध्यमातून पथक समुद्रात जाऊन काही बोटींची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 11 लाख किंमतीचे 11 हजार लिटर इतके डिझेल अवैधरित्या बोटींमध्ये साठवून ठेवलेले आढळून आले.

दोन्ही बोटींचे खलाशी ताब्यात

पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बोटींच्या खलाश्यांना अटक केलेली असून बोटींच्या मालकांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील दोन्ही बोटी जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 70 लाख इतकी आहे. पोलिसांनी जप्त केलेला एकूण मुद्देमाल 80 लाखांचा असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Virar Worker Death : विरारमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड मारताना मजुराचा पडून मृत्यू

‘कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच’, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर निशाणा, UPA अध्यक्षपदावरुन टोलेबाजी

Washim Bus Accident : रस्त्यालगतचे लोखंडी कठडे तोडून बस थेट शेतात पटली! थोडक्यात अनर्थ टळला

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.