मुंबईत मंगळवारी कांदिवली, बोरिवली, दहिसर व मालाड मधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद

या कालावधीत कांदिवली (पूर्व), बोरिवली (पूर्व), दहिसर (पूर्व) आणि मालाड (पूर्व) परिसरांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.

मुंबईत मंगळवारी कांदिवली, बोरिवली, दहिसर व मालाड मधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद
Mumbai tuesday water cutImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 8:51 PM

मुंबई – मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC)कांदिवली (पूर्व)  येथील लोखंडवाला वसाहतीत (Kandivali Lokhandwala)१८०० मिलीमीटर जलवाहिनीसोबत १५०० मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचे काम व ठाकूर व्हिलेज येथे १८०० मिलीमीटर जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता सुरु होऊन ते बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यास्तव, या कालावधीत कांदिवली (पूर्व), बोरिवली (पूर्व), दहिसर (पूर्व) आणि मालाड (पूर्व) परिसरांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा (Water cut)पूर्णपणे बंद राहणार आहे.संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१) आर/उत्तर विभागः भरूचा रस्ता, मराठा वसाहत, हरिशंकर जोशी रस्ता, वाय. आर. तावडे रस्ता, अंबावाडी रतन नगर, परबत नगर राजेश कंपाऊंड, ओवरीपाडा, छत्रपती शिवाजी रस्ता, पश्चिम रेल्वे वसाहत, दहिसर स्थानक एल. टी. रस्ता, वामनराव सावंत रस्ता, आर. टी. रस्ता, एस. व्ही. रस्ता, हायलँड पार्क, शैलेन्द्र नगर, किसन नगर, एस. एन. दुबे रस्ता, अवधूत नगर, दहिसर सबवे, आनंद नगर, तरे कंपाऊंड, हनुमान टेकडी (काजूपाडा) – (पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

हे सुद्धा वाचा

२) आर/मध्य व आर/उत्तर विभागः अ) संत ज्ञानेश्वर मार्ग (शांतिवन), श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, सावरपाडा, काजूपाडा (सखल पातळी परिसर), ईश्वर नगर, सुदाम नगर, चोगले नगर,

ब) ओवरीपाडा (अंशत:), राजेश कंपाऊंड, शांती नगर, अशोकवन (सखल पातळी परिसर), शिव वल्लभ मार्ग (दक्षिण बाजू), संत ज्ञानेश्वर मार्ग, नॅन्सी डेपो, चोगले नगर, सावरपाडा, संभाजी नगर, शिव टेकडी, संतोष नगर, गणेश नगर, शुक्ला कुंपण, पांडे नगर – (सकाळी ८.३० ते सकाळी १०.४५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

३) आर/मध्य व आर/उत्तर विभागः अ) काजूपाडा (उंच पातळी परिसर), माने कंपाऊंड, पाटील कंपाऊंड, जगरदेव कंपाऊंड, ओम सिद्धराज संकुल, गिरीशिखर संकुल, मोठी मस्जिद परिसर.

ब) अशोकवन (उंच पातळी परिसर), देशमुख रेसिडेन्सी, साईश्रद्धा फेज १ व २- (सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

४) आर/उत्तर विभागः शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा (अंशतः), एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, संत मीराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर – (सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.४० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

५) आर/उत्तर विभागः आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, छत्रपती शिवाजी संकुल, भाबलीपाडा, अवधूत नगर, वर्धमान इंडस्ट्रीअल इस्टेट, सुधींद्र नगर, केतकीपाडा ऑन लाईन पंपिंग – (रात्री ९.३० ते रात्री ११.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

६) आर/मध्य विभागः हनुमान टेकडी पंपिंगचा भाग (काजूपाडा) – (पहाटे ४.५० ते सकाळी ६.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

७) आर/मध्य विभागः बोरिवली स्थानक पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग, महात्मा गांधी मार्ग (एम. जी. मार्ग), सुकरवाडी, मुख्य कस्तुरबा मार्ग, कस्तुरबा मार्ग क्रमांक ०१ ते १०, राजेंद्र नगर, गणेश वाडी, राय डोंगरी, दौलत नगर, देवीपाडा, कुलूपवाडी, ९० फीट डीपी मार्ग, जय महाराष्ट्र नगर, टाटा पॉवर हाऊस, देवीपाडा, गणेश नगर, सिद्धार्थ नगर, नॅशनल पार्क, संपूर्ण बोरिवली पूर्व भाग – (पहाटे ४.३० ते सकाळी ६.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

८) आर/दक्षिण विभागः आकुर्ली मार्ग, अशोक नगर – (सकाळी ९.३० ते सकाळी ११.४० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

ठाकूर संकुल, बाणडोंगरी – (सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

समता नगर, म्हाडा इमारती – (सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

ठाकूर गांव, म्हाडा पुनर्वसन – (सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

जानूपाडा – (२४ तास पाणीपुरवठा) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

सिंग इस्टेट, लक्ष्मी नगर – (पहाटे ५.०० ते सकाळी ११.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

बारक्या रामा कंपाऊंड, आझादवाडी – (सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

पंचायत समिती – (पहाटे ५.०० ते सकाळी ११.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

रहेजा संकुल – (रात्री ११.३० ते पहाटे ४.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

भीम नगर, गौतम नगर – (२४ तास पाणीपुरवठा) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

हनुमान नगर, नरसीपाडा – (सकाळी ८.०० ते सकाळी १०.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी आणि दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

लोखंडवाला म्हाडा – (पहाटे ५.०० ते सकाळी ९.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी आणि दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

लोखंडवाला वसाहत (खालचा भाग) – (सायंकाळी ५.०० ते रात्रो ९.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी आणि दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

लोखंडवाला वसाहत (उच्च भाग) – (रात्री ११.३० ते पहाटे ५.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी आणि दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

९) पी/उत्तर विभागः क्रांती नगर खालचा भाग (गोकुळ नगर, दुर्गा नगर, गांधी नगर, भीम नगरचा भाग) – (पहाटे ५.०० ते सायंकाळी ५.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

अप्पापाडा खालचा भाग (आनंद नगर, अनांदेय नगर, सई बाई नगर, महेश्वर नगर) – (पहाटे ५.०० ते सायंकाळी ५.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

क्रांती नगर वरचा भाग (झुंजार चाळ, आंबेडकर चौक, भाजी मार्केट मार्ग, वीर हनुमान चाळ, महात्मा फुले चाळ, नटराज चाळ, गणेश चाळ.) – (सायंकाळी ५.०० ते पहाटे ५.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

अप्पा पाडा वरचा भाग (प्रथमेश नगर, महाराष्ट्र नगर, प्रणिता निवास, वनश्री चाळ) – (सायंकाळी ५.०० ते पहाटे ५.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

भीम नगरचा भाग, मंगलकृपा आणि अप्पापाडा, एस. आर. ए. इमारत, आनंदवाडी, शिवाजी नगर, संताजी धनाजी मार्ग, तानाजी नगरचा भाग – (सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.