AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; पोलिसांकडून मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी

पोलीस बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. जे वाहनचालक कोरोना नियमांचे आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात  येत आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; पोलिसांकडून मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 6:38 AM
Share

मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील शहरात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीवर रात्रीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मुलुंड टोलनाक्यावर पोलीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.

ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाची भीती

नववर्षाचे स्वागत  करण्यासाठी अनेकजण मुंंबईमध्ये येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नववर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आहे. यंदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे कोरोना संकट टळल्याचे बोलले जात होते. कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा ओमिक्रॉनने डोकेवर काढले आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नववर्षाचे स्वागत घरी राहूनच करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू आहे.

बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी

पोलीस बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. जे वाहनचालक कोरोना नियमांचे आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात  येत आहे. वाहनधारकांना मुंबईमध्ये येण्याचे कारण, तसेच वाहनाचे वैध कागदपत्रांची देखील पोलिसांकडून विचारणा होत आहे. नववर्षाच्या निमित्ताने मुंबईमध्ये अनेक जण येतात. सध्या राज्यात ओमिक्रॉनची साथ चालू आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच संभाव्य घातपात टाळण्यासाठी तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सबंधित बातम्या

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांचा जल्लोष, पुन्हा फटाके फोडले

Breaking : आमदार नितेश राणेंना दिलासा नाहीच, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला, पुढे काय?

राणेंना नोटीस देणाऱ्या पोलिसांवरच FIR दाखल करा, अन्यथा आम्ही खटला दाखल करु-फडणवीस

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.