पाकिस्तानात यात्रेला गेलेल्या विवाहित भारतीय महिलेने केलं लाहोरच्या पुरुषाशी लग्न!
वृत्तानुसार, ही महिला सोशल मीडियावर मुहम्मद इम्रानच्या संपर्कात होती, जे तिच्या पतीच्या माहिती होती. पाकिस्तानात पोहचून तिने जस्टिस ऑफ पीसच्या कार्यालयात याचिका दाखल केली आणि तिच्या भारतीय शीख नवऱ्याच्या उपस्थितीत तिने इम्रानशी लग्न केले.
नवी दिल्लीः एका शिख समुदायातील विवाहित महिलेनं पाकिस्तानात (Pakistan) जाऊ धर्मांतर करुन एका मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. मुळ कोलकाताची (Kolkata) असलेली ही महिला आपल्या पतीसोबत पाकिस्तानात गुरुनानक जयंती (Gurunanak Jayanti) साजरी करण्यासाठी गेली होती. तेव्हा तिथे तिने एका मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं. महत्वाची बाब म्हणजे यावेळी तिचा पतीही तिथे उपस्थित होता!
गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर 17 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या महिलेनं अटारी बॉर्डरवरुन पाकिस्तानात प्रवेश केला. त्यानंतर 24 नोव्हेंबरला तिने मोहम्मद इम्रान या व्यक्तीसोबत तिले लग्न केलं. या मुस्लीम वक्तीशी लग्न करण्यापूर्वी तिने मुस्लीम धर्मही स्वीकारल्याची माहिती मिळतेय. तसंच लाहोर न्यायालयात याचिका दाखल केली आणि परवीना सुलतान असं तिचं नाव ठेवण्यात आलं.
महिला, भारतीय पती आणि पाकिस्तानी पतीही मूकबधिर!
दरम्यान, या महिलेनं पाकिस्तानात मुस्लीम व्यक्तीशी लग्न केलं असलं तरी ती पाकिस्तानमध्ये राहू शकली नाही आणि तिला भारतात परत पाठवण्यात आले. 26 नोव्हेंबरला वाघा-अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवर शीख जथ्यासह ती भारतात परत आल्याचंही कळतंय. विशेष म्हणजे, संबंधित महिला आणि तिचा भारतीय पती मूकबधिर आहेत आणि मुहम्मद इम्रान हा तिचा पाकिस्तानी पती देखील मूकबधिर आहे.
भारतीय नवऱ्याच्या उपस्थितीत पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न!
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सोशल मीडियावर मुहम्मद इम्रानच्या संपर्कात होती, जे तिच्या पतीलाही माहिती होती. पाकिस्तानात पोहचून तिने जस्टिस ऑफ पीसच्या कार्यालयात याचिका दाखल केली आणि तिच्या भारतीय शीख नवऱ्याच्या उपस्थितीत तिने इम्रानशी लग्न केले! तिने नंतर स्वतःला परवीन सुलताना असं नाव दिलं. मोहम्मद इम्रान हा पाकिस्तानी पंजाबमधील राजनपूरचा रहिवासी आहे. 23 नोव्हेंबर रोजी तिने तिच्या भारतीय पतीला घटस्फोट दिला आणि इम्रानसोबत तिचा निकाह पार पडला.
एका भारतीय शीख महिला तीर्थयात्रेसाठी पाकिस्तानात गेली. तिथे धर्म परिवर्तन करुन तिने पाकिस्तानी पुरुषाशी लग्न केलं, या संपूर्ण घटनेमुळे देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या