Kirit Somaiya INS Vikrant Case : किरीट सोमय्यांची सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी, काल तीन तास, आज किती तास चौकशी?
Kirit Somaiya INS Vikrant Case : आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची आज दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून ही चौकशी करण्यात येत आहे.
मुंबई: आयएनएस विक्रांत (ins vikrant) घोटाळ्या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांची आज दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांच्या (mumbai police) आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून ही चौकशी करण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोमय्यांची चौकशी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून सोमय्या यावेळी पोलिसांना काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काल सोमय्या यांची तब्बल तीन ते चार तास चौकशी झाली होती. यावेळी सोमय्यांवर प्रश्नांचा भडिमार केला होता. त्यानंतर पुन्हा सोमय्या यांची आज चौकशी होत आहे. पण ही चौकशी किती तास चालेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
किरीट सोमय्या हे मुलुंड येथील निलम नगरमधील घरातून पोलीस आयुक्त कार्यालयाकडे आले. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. काल सोमय्यांना त्यांची गाडी आत नेऊ दिली नव्हती. त्यामुळे त्यांना दूर उतरुन पायी चालत जावे लागले होते. त्याबाबत सोमय्या यांना विचारले असता. माझ्याबाबत चुकीची माहिती देऊ नका. गाडी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत गेली. पोलीस आयुक्तांच्या ऑफिसच्या गेटपर्यंत गाडी गेली. आम्ही पोलिसांना संपूर्ण सहकार्य केलं. पोलिसांनी जी जी माहिती मागितली ती दिली आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.
सोमय्यांवरील आरोप काय?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली मुंबईतून निधी गोळा केला होता. त्याची व्याप्ती राज्यव्यापी असून काही राज्यांमध्येही हा निधी गोळा केला गेला. एकूण 58 कोटी रुपये जमा केले गेले. सुमारे 600 ते 700 बॉक्स भरेल एवढा निधी होता. हे बॉक्स सोमय्या यांच्या मुलुंड निलम नगरमधील निवासस्थानी आणि एका बिल्डरच्या कार्यालयात हा निधी ठेवण्यात आला होता. हा पैसा राजभवनला दिला गेला नसल्याचं राजभवनने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा पैसा गेला कुठे? असा सवाल राऊत यांनी केला होता. तर या प्रकरणावरील सुनावणीवेळी सोमय्या यांच्या वकिलांनी राजभवनाचं खातं नसल्याने हा पैसा पक्षाकडे दिल्याचं म्हटलं होतं. त्यावरून विरोधकांनी सोमय्यांवर चांगलाच निशाणा साधला होता.
संबंधित बातम्या:
MNS Raj Thackeray: भोंग्यांच्या डेडलाईन आधीच शिवतीर्थावर मनसेची खलबतं; राज ठाकरे काय आदेश देणार?