पडसलगीकरच 2020 पर्यंत राज्याचे पोलिस महासंचालक?
मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या नियुक्तीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने प्रतिज्ञा पत्र सादर करण्यात आलीत. या प्रतिज्ञापत्रात दत्ता पडसलगीकर यांना जून 2020 पर्यंत पोलिस महासंचालकपदावर ठेवण्याचा प्रस्ताव तयार केल्याच प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर दत्ता पडसलगीकर हेच राज्य […]
मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या नियुक्तीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने प्रतिज्ञा पत्र सादर करण्यात आलीत. या प्रतिज्ञापत्रात दत्ता पडसलगीकर यांना जून 2020 पर्यंत पोलिस महासंचालकपदावर ठेवण्याचा प्रस्ताव तयार केल्याच प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
या पार्श्वभूमीवर दत्ता पडसलगीकर हेच राज्य सरकारला पुढील दीड वर्षे अजून पोलिस महासंचालक म्हणून हवेत, हे स्पष्ट झालं आहे. उद्या या प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर पुन्हा सुनावणी होणार आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करताना नियमांचं पालन करण्यात आलं नाही. यामुळे ही नियुक्ती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी जनहित याचिका करण्यात आली आहे. ही याचिका अॅड. आर. आर. त्रिपाठी यांनी दाखल केली आहे. अॅड. त्रिपाठी यांनी आज सुनावणी घेण्याची विनंती करुन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी आपली बाजू सादर केली नसल्याचं कोर्टाच्या लक्षात आणून दिलं. त्यावर राज्याच्या अॅडव्होकेट जनरल आणि केंद्र सरकारच्या वकिलांनी आजच्या आज आपली बाजू सादर करावी आणि आपण या प्रकरणात उद्या नऊ जानेवारी रोजी निकाल देऊ अस मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे आज बाजू सादर करण्यात आली.
कोण आहेत दत्ता पडसलगीकर?
दत्ता पडसलगीकर हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस आहेत. आयबी, गुन्हे शाखा, तसेच मुंबई पोलिस आयुक्तपदासह पोलिस सेवेतील अत्यंत महत्त्वाची अशी पदं त्यांनी भूषवली आहेत. सध्या राज्याच्या पोलिस महासंचालकपदी ते कार्यरत आहेत.