VIDEO: मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिक यांच्या आरोपाने खळबळ

कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. (nawab malik)

VIDEO: मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिक यांच्या आरोपाने खळबळ
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 1:22 PM

मुंबई: कोणत्याही मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून भाजपने मात्र मलिक यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. (ips, ias officer had met opposition leader before allegations on maharashtra minister, says nawab malik)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. काही आयपीएस, आयएएस अधिकारी मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात.हे नियोजित कटकारस्थान आहे, त्यांच्या भेटी आम्ही वेळोवेळी उघड करू. केंद्रीय नेते आणि फडणवीसांना भेटून हे अधिकारी आरोप करतात, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

केंद्रीय नेत्यांबरोबर बैठका झाल्यानंतरच आरोप

काही अधिकारी या सरकारवर आरोप करत आहेत. त्यांच्या फडणवीसांसोबत आरोप करण्यापूर्वी बैठका झाल्या आहेत. ठरवून कटकारस्थान केलं जात आहे. वेळ आली तर त्याची माहितीही देऊ. कोणते अधिकारी आणि विरोधी पक्षनेते आरोप करण्यापूर्वी कुठे भेटले आणि कसे भेटले याची माहिती देऊ, असं ते म्हणाले. फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतर आरोपांची मालिका सुरू झाली आहे, असा दावाही त्यांनी केला. देशातील संस्था आणि एजन्सी याचा राजकीय वापर होतो हे आता लपून राहिले नाही. ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवर आता कोर्टानेही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते जेवढे हैराण करतील तेवढी जनता आमच्यासोबत राहील, असंही त्यांनी सांगितलं.

ठरवून टार्गेट केलं जात आहे

भाजपचे केंद्रातील सरकार जिथे विरोधी पक्षाचं सरकार आहे. तिथे त्या सरकारला बदनाम करण्यासाठी, त्या सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहे. बंगालमध्ये तिच परिस्थिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तसंच केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. अनिल देशमुख, भावना गवळी, अनिल परब आणि संजय राऊत असतील या सर्वांना राजकीय हेतूने टार्गेट केलं जात आहे. कोणताही अधिकारी भ्रष्ट असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण सर्व विषय राजकीय हेतूने जोडण्यात येत आहे. हे सर्व कट कारस्थान भाजपने रचलं आहे, असंही ते म्हणाले.

आरोप चुकीचे

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत कामानिमित्त अधिकारी माजी मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेत्यांना भेटत असतात. त्यामुळे त्याचा अर्थ वेगळा काढणं योग्य नाही, असं दरेकर म्हणाले.

अधिकारी भेटणं गैर नाही

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी अनेक वर्षे सत्तेत आणि विरोधात होतो. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा सर्व अधिकारी मलाही भेटत होते. मी एखादी गोष्ट सांगितली. ती योग्य असेल तर ते नाही म्हणायचे नाही. लोकशाहीमध्ये अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवणं यात गैर नाही. पण अधिकाऱ्यांचा गैरवापर होत असेल तर ते चुकीचं आहे. अधिकारी माजी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षांना भेटले तर त्यात गैर नाही. उद्या पृथ्वीराज चव्हाणांना भेटले तरीही गैर नाही, त्याची चिंता करण्याची गरज नाही. अधिकारी सर्व काही व्यवस्थित ओळखत असतात. त्यांना सर्व समजतं. केव्हा, कधी, कशा पद्धतीने पावलं टाकावी, हे अधिकाऱ्यांना समजतं, असं शरद पवार म्हणाले. (ips, ias officer had met opposition leader before allegations on maharashtra minister, says nawab malik)

संबंधित बातम्या:

विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू; ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा

बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

कोकणात एकटाच भाजपचा आमदार तरीही ट्रेन सोडली, शिवसेनेने किमान अर्धी ट्रेन तरी सोडावी; नितेश राणेंचा टोला

(ips, ias officer had met opposition leader before allegations on maharashtra minister, says nawab malik)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.