AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिशाब तो देना पडेगा, मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांच्या ED चौकशीवर किरीट सोमय्यांचा इशारा?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांना ईडी चौकशीला बोलवल्यानंतर ट्विट केले आहे. हिशाब तो देना पडेगा, असे वक्तव्य त्यांनी केले.

हिशाब तो देना पडेगा, मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांच्या ED चौकशीवर किरीट सोमय्यांचा इशारा?
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल
| Updated on: Jan 14, 2023 | 9:33 AM
Share

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal )यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ईडीच्या या आदेशावर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची प्रतिक्रिया आली आहे. हिशाब तो देना पडेगा, असे वक्तव्य त्यांनी केले. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी 16 जानेवारीला सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलवले आहे. त्यामुळे चहल यांच्या अडचणी वाढणार आहे. चहल यांना आलेल्या ईडीच्या समन्ससंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी चहल यांनी कोणत्याही तपास यंत्रणांना आतापर्यंत सहकार्य केले नाही, असा दावा केला आहे. आता चहल यांना हिशोब द्यावे लागणार आहे. चहल हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे की मातोश्रीचे? असा सवाल सोमय्या यांनी टीव्ही ९ शी बोलतांना व्यक्त केला.

सोमय्या यांनी म्हटले की, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांना कोरोना काळात कॉन्ट्रक दिले गेले. सुजीत पाटकर यांनी हजारो कोव्हीड रुग्णांच्या जिवाशी खेळ केला. त्यांना उद्धव ठाकरे यांनी पाच-पाच कॉन्ट्रक दिले. शंभर कोटींचे कॉन्ट्रक दिले आहे. चहल यांनी कोणत्याही तपास संस्थांना कागदपत्रे दिले नाही. आता त्यांना आयकर विभागाने नोटीस दिली आहे. कंपनी मंत्रालयाने कागदपत्रांची चौकशी केली आहे. सोमवारी ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. यामुळे मुंबई मनपातील कोव्हीड घोटाळा जनतेसमोर येणार आहे.

नेमकं प्रकरण काय? भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. किरीट सोमय्या यांनी गेल्यावर्षी आझाद मैदानात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचंदेखील नाव होतं.संबंधित प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. त्यानंतर आता याच प्रकरणाचा समांतर तपास आता ईडीकडूनही केला जातोय. त्यामुळे या प्रकरणी आता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची देखील चौकशी ईडीकडून केली जाणार आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.