AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: शांताबाई खरंच पूजा चव्हाणची आजी आहे का? पूजाच्या आत्महत्येनंतर आता नात्यातील फ्रॉड?

जा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव आलं आणि त्यानंतर बंजारा समाजातील पोहरादेवी संस्थान असेल वा पूजाचे आई-वडील...सगळेच संजय राठोड यांच्या बाजूने उभे राहिले... (is shantabai rathod pooja chavan's grandmother? know about facts)

VIDEO: शांताबाई खरंच पूजा चव्हाणची आजी आहे का? पूजाच्या आत्महत्येनंतर आता नात्यातील फ्रॉड?
शांताबाई राठोड, बीड
| Updated on: Mar 03, 2021 | 8:19 PM
Share

मुंबई: पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव आलं आणि त्यानंतर बंजारा समाजातील पोहरादेवी संस्थान असेल वा पूजाचे आई-वडील…सगळेच संजय राठोड यांच्या बाजूने उभे राहिले…आत्महत्येला 15 दिवस उलटूनही वानवडी पोलिसांत कुणी तक्रारही दाखल केली नव्हती…मात्र, त्याच काळाच एक महिला पुढं आली..नाव शांताबाई राठोड…पूजाची चुलत आजी असल्याचा दावा शांताबाईंनी केला…आणि आधी पूजाच्या मृत्यूप्रकरणात काही लपवलं जात असल्याचा आरोप केला. (is shantabai rathod pooja chavan’s grandmother? know about facts)

5 कोटी रुपये घेतले

पुजाच्या आई-वडिलांनी थेट 5 कोटी घेतल्याचाही दावा केला..आणि नंतर थेट वानवडी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली…एवढंच नाही तर या तक्रारीत थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं….त्यामुळंच आता प्रश्न येतो शांताबाई खरंच पूजाच्या आजी आहेत का? आणि त्या मूळच्या कुठल्या आणि त्यांची पार्श्वभूमी काय ? हेच सगळं आपण आजच्या व्हिडीओत पाहणार आहोत…

सगळ्यात आधी प्रश्न उपस्थित होतो शांताबाई खरंच पूजाच्या आजी आहेत काय? तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला चव्हाण आणि राठोड कुटुंबाची वंशावळ तपासावी लागेल. धना चव्हाण हे लहू चव्हाण यांचे पंजोबा. त्यांना 5 मुलं होती. गोविंद चव्हाण, हिरा चव्हाण, राम चव्हाण, धना चव्हाण आणि देवराम चव्हाण. यातील गोविंद चव्हाण यांना पुन्हा 5 मुलं झाली प्रभू, चंदू, बाबूराव, नंदू आणि बडगू. यातील चंदू हे लहू यांचे वडील. तर देवराम यांना राजेंद्र, संजय आणि विजय अशी 3 मुलं होती. त्यातील राजेंद्र यांच्याशी शांताबाईंचा विवाह झाला. त्यामुळे लहू चव्हाण हे शांताबाईंचे पुतणे लागतात आणि त्याच अर्थाने लहू चव्हाण यांची मुलगी पूजा ही त्यांची नात लागते. म्हणजेच शांताबाई या चुलत आजी लागतात. शांताबाईंकडून ही वंशावळ प्रसिद्ध करण्यात आलीय, जी खोटी ठरवून दाखवा असं आव्हान शांताबाईंनी दिलंय..

मग आता अनेकजण प्रश्न विचारतात, शांताबाई जर आजी असतील तर त्यांचं नाव राठोड कसं? तर राठोड हे शांताबाईंचं माहेरचं आडनाव आहे. त्यांचं सासरचं आडनाव चव्हाण हेच आहे. मात्र, शांताबाई सध्या राठोड म्हणजेच माहेरचंच आडनाव वापरत असल्याचं शांताबाई सांगतात.

शांताबाई कोण?

पुढचा प्रश्न, शांताबाईंचा इतिहास काय? आणि त्या काय करतात? तर शांताबाई मूळच्या बीड जिल्ह्यातल्या. परळीपासून अवघ्या 5 किलोमीटरवर बंजारा समाजाचा एक तांडा आहे. ज्याला धारावती तांडा म्हटलं जातं तिथंच शांताबाई राहतात. दारुमुळे उद्धव्स्त झालेले अनेक संसार शांताबाईंना पाहिले, वैयक्तिक आयुष्यातही दारुचे विपरित परिणाम त्यांना भोगावे लागले. याच सगळ्यातून त्यांनी दारुविरोधी चळवळ उभी केली. इतर महिलांच्या मदतीने शांताबाईंनी दारुला हद्दपार करण्याचा विडा उचलला. त्यात जातीतील अनेक कुप्रथांनाही शांताबाईंनी विरोध केलेला स्थानिक लोक सांगतात. त्यातूनच शांताबाई सामाजिक कार्यात उतरल्या.

पूजा चव्हाण हीच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित करत, शांताबाई चव्हाण यांनी तपासाची दिशाच वळवली. लहू चव्हाण यांनी 5 कोटी घेतल्याचा आरोप असो किंवा चव्हाण कुटुंबाकडून आपली हत्या होणार असल्याचा खळबळजनक दावा. शांताबाई सध्या कुठल्याही स्वरुपात माघार घेताना दिसत नाहीत.

मला मारण्याचा प्रयत्न

पूजाच्या आत्महत्याप्रकऱणी शांताबाईंनी वानवडी पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यात त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, अरुण राठोड यांची नाव लिहली. तर दुसऱ्या बाजूला लहू चव्हाण यांनी शांताबाईंविरोधात परळी पोलिसांत तक्रार दाखल केली…

शांताबाई आमच्या कुणी नाहीत

आई-वडील आवाज उठवत नसतील, तर मला आवड उठवणं गरजेचं असल्याचं म्हणत शांताबाईंनी आई-वडीलांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं निर्माण केलं. शिवाय समाजाची दिशाभूल केली जाते, मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली जातेय, असं म्हणत त्यांनी तपासावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. एकूणच भाजपच्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांविरोधात जे रान उठवलं, त्याला शांताबाई राठोड यांनी बळ दिलं…आणि त्यामुळं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तपासाची चक्र फिरु लागली आहेत..

तुम्हाला काय वाटतं, शांताबाई खरंच पूजाच्या चुलत आजी असतील काय? आणि त्यांच्या आरोपात किती तथ्यं आहे? हे आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा, व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबूक आणि ट्वीटरवर आम्हाला फॉलो करा. आणि इतर सगळ्या बातम्यांच्या माहितीसाठी टीव्ही9 मराठी डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या. (is shantabai rathod pooja chavan’s grandmother? know about facts)

संबंधित बातम्या:

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

पूजा चव्हाणला नेमकं काय झालं होतं? ती स्ट्रीप रेड का झाली?; कथित मंत्री का घाबरला?

पुजा आणि कथित मंत्र्यांचा शेवटचा संवाद कोणता? मंच्युरियन, ज्यूस आणि बरंच काही, ऐका, वाचा !

(is shantabai rathod pooja chavan’s grandmother? know about facts)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.