महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

सत्तासंघर्षाचा निकाल नेमका काय लागेल? याकडे अख्या महाराष्ट्राच्या नजरा आहेत. पण निकालाआधीच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मोठं भाकित केलंय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 10:32 PM

मुंबई : सुप्रीम कोर्टात (Supreme Court), आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निकाल अजून जाहीर झालेला नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 16 आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाची आहे. त्यावर सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठासमोर सुनावणी पूर्ण झालीय. पण थेट अपात्रतेसंदर्भातला निर्णय आला तर 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समावेश आहे. आणि शिंदे अपात्र झाले तर सरकारच पडणार. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागेल, असं जयंत पाटलांना वाटतंय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतंय की, 16 आमदार अपात्र होणार आणि सरकार कोसळणार. जर कोर्टाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं लागला तर आमदार अपात्र होणार नाही आणि सरकार शाबूत राहील. जर कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं आला तर शिंदेंचं अपात्र झाल्यास सरकार कोसळेल. पण सरकार कोसळणार नाही आणि राष्ट्रपती राजवटही लागणार नाही असं सत्ताधारी म्हणतायत. आता ज्या राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख जयंत पाटलांनी केला. त्या राष्ट्रपती राजवटीबद्दलही जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

सरकारनं बहुमत गमावल्यास राष्ट्रपती राजवट लागते. जर राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असल्यास सरकार घटनात्मक तरतुदींनुसार चालत नसल्यास आणि राज्यानं केंद्राचे महत्वाचे निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते.

विशेष म्हणजे जयंत पाटलांनी राष्ट्रपती राजवटीबद्दलच भाकीत केलेलं नाही तर त्यांनी शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुनही निशाणा साधलाय. 6 एप्रिलला आपले मंत्री, आमदार आणि खासदारांसह शिंदे अयोध्येला भगवान रामलल्लांच्या दर्शनाला जात आहेत. पण त्यावर जयंत पाटलांनी एकटं जावून पूजा करा, मंत्रिमंडळ कशाला, असा टोला लगावलाय. सत्तांतरानंतर शिंदे सरकारला 9 महिने झालेत. सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झालीय. निकाल कधीही येऊ शकतो. त्यामुळं निकाल काय येतो, त्यावर पुढच्या घडामोडी अवलंबून असेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.