BREAKING : जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात, अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. जयंत पाटील यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली होती. अजित पवारांच्या दौऱ्यातही ते सोबत होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरनुकसानीची माहिती दिली होती. (NCP Maharashtra president Jayant Patil admitted in breach candy hospital )
दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे.
सांगलीच्या पूरस्थितीत रस्त्यावर उतरुन पाहणी करत मदतकार्य
सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना देत पाहणी केली होती. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावं आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं. अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने, पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं होतं.
पूर नियंत्रणासाठी कर्नाटक सरकारशीही चर्चा
कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मोठा धोका निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर 2019 च्या महापुराची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जयंत पाटील कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनाही भेटले होते. अलमट्टी आणि हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगली-कोल्हापूरमधील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी घटेल, त्यामुळे महापुराचं संकट टळण्यास मदत होते. त्यामुळे पाटील यांनी येडियुरप्पा यांची भेट घेतली होती. आता कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत होतं.
VIDEO : महाराष्ट्रात 14 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बध शिथील होण्याची शक्यता ?#Maharashtra #MaharashtraCorona #LockdownUpdate pic.twitter.com/LjlgKQPMOs
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2021
इतर बातम्या :
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात
Video : मी काय राज कुंद्रा आहे का?, राज ठाकरेंचा खोचक प्रश्न, उपस्थितांमध्ये हशा
NCP Maharashtra president Jayant Patil admitted in breach candy hospital