तर आधी उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी लागेल; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारलं

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चांगलेच फटकारले आहे. (jayant patil slams bjp over president rule in maharashtra)

तर आधी उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी लागेल; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारलं
jayant patil
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 2:44 PM

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चांगलेच फटकारले आहे. राष्ट्रपती राजवट लागू करायचीच झाली तर आधी उत्तर प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यात लावावी लागेल, असं सांगतानाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं इतकं सोपं नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. (jayant patil slams bjp over president rule in maharashtra)

जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे असं विचारण्यात आलं. त्यावेळी पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत राणेंच्या मागणीची खिल्ली उडवली. मासा पाण्याबाहेर काढल्यावर तो तडफडतो. सत्तेच्या बाहेर पडलेल्यांची अवस्था तशीच झाली आहे. त्यामुळे ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात. राज्यात कधी राष्ट्रपती राजवट लागू होते आणि कधी आम्ही सत्तेत येतो असं विरोधकांना झालं आहे, असा चिमटा काढतानाच राष्ट्रपती राजवट लागूच करायची असेल तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये लावावी लागेल. त्यात या राज्यांचा नंबर वरचा आहे. त्यानंतर इतरही राज्य आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं इतकं सोप नाही, असं ते म्हणाले.

मुनगंटीवारांचं विधान लोकशाही विरोधी

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुनगंटीवार यांचं विधान लोकशाही विरोधी आहे. लोकशाही प्रक्रियेनुसार लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार आहे. हे सरकार पाडण्याची भाषा विरोधक करत आहेत. विरोधकांनी सरकार पाडण्याची वल्गना करण्यापेक्षा किमान विरोधक म्हणून तरी काम केलं पाहिजे. अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार येणार नाही हे स्पष्टपणे जाणवलं. विरोधातच राहावं लागेल असं त्यांना दिसून आलं. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून थोडंफार काम केलं. तेच विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनीही करावं, असा चिमटाही त्यांनी काढला.

माहिती बाहेर येऊ नये

एनआयएने एखाद्या घटनेचा तपास केला पाहिजे. पण तपास यंत्रणांनी तपासाची माहिती बाहेर येऊ देऊ नये. ज्या पद्धतीने बातम्या सोडल्या जात आहेत, त्यामुळे समाजात चुकीची आणि अर्धवट माहिती जात आहे. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. ते योग्य नाही, असं सांगतानाच वाझे प्रकरणात चौकशी अंती जे सत्यबाहेर येईल त्यानुसार कारवाई करू, असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच सर्व सत्यबाहेर येईल, असंही ते म्हणाले. (jayant patil slams bjp over president rule in maharashtra)

संबंधित बातम्या:

Param Bir Singh : मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या रेसमध्ये नवं नाव, अनिल देशमुखांसोबत तासभर चर्चा?

सचिन वाझेप्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील, त्यांच्यावर कारवाई : अजित पवार

सचिन वाझेंनीच स्वत:च्या सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केले; NIAचा संशय

(jayant patil slams bjp over president rule in maharashtra)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.