दूध मांगोगे दूध देंगे, इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी, गुजरात को देंगे, शिंदे-फडणवीसांचं ते बॅनर; जयंत पाटील यांची खोचक टीका काय?
जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तीन बॅनर्स दिसत आहेत. तिन्ही बॅनर्सवर मजकूर लिहिलेला दिसत आहे.
मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यापासून या सरकारवर सातत्याने नवनवे आरोप केले जात आहेत. या सरकारच्या काळात राज्यातील उद्योग इतर राज्यात जात असल्याचा आरोपही केला जात आहे. शिंदे सरकारच्या काळात गुजरातला उद्योग गेल्याने कोट्यवधींची गुंतवणूक तर गेलीच, पण हजारो रोजगारही गेल्याचा आरोप विरोधकांनी केले आहेत. विरोधकांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांकडून उत्तरही देण्यात आलं आहे. मात्र, आरोपांची मालिका काही थांबताना दिसत नाहीत. आता सोशल मीडियातही शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होऊ लागली आहे. गुंतवणूक गेल्याचे, बॅनर्स, फोटो आणि मिम्स व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असंच एक बॅनर ट्विट करून शिंदे सरकारवर खोचक टीका केली आहे.
काय आहे ट्विट?
जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तीन बॅनर्स दिसत आहेत. तिन्ही बॅनर्सवर मजकूर लिहिलेला दिसत आहे. एका बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे. एका बॅनरवर दूध मागोंगे दूध देंगे, असं लिहिलं आहे. दुसऱ्या बॅनरवर खीर मांगोंगे खीर देंगे, असं लिहिलं आहे.
ज्या तिसऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, त्यावर वेगळाच मजकूर लिहिला आहे. इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी, गुजरात को देंगे, असं त्यात म्हटलं आहे.
फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा! ? pic.twitter.com/CxBBRMtaKn
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 9, 2023
पाटलांची खोचक टीका
हा फोटो शेअर करून त्यावर जयंत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा!, असं खोचक ट्विट पाटील यांनी केलं आहे.
पाटील यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तीन हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो पाहिला आहे. 48 जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. तब्बल 300 जणांनी त्याला लाइक्स केलं आहे. तर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.