AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुहू हादरलं! बदलापूर सिनेमाप्रमाणे चक्क बॅगमध्ये डेडबॉडी, नववीत शिकणाऱ्या मुलीची बलात्कार करुन हत्या?

ज्या शस्त्राने या पंधरा वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली, ते शस्त्रही पोलिसांनी या झोपडीतून ताब्यात घेतलं आहे. तसेच या हत्येनंतर फरार झालेल्या संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांची टीम गुजरातमध्ये गेल्याची माहितीही तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये या मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की, अत्यंत निर्घृणपणे या मुलीचा खून करण्यात आला. तिच्या ओटीपोटात किमान 12 वेळा भोसकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

जुहू हादरलं! बदलापूर सिनेमाप्रमाणे चक्क बॅगमध्ये डेडबॉडी, नववीत शिकणाऱ्या मुलीची बलात्कार करुन हत्या?
भयानक.. Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 2:41 PM

मुंबई- एका पंधरा वर्षांच्या मुलीचा ( 15 years old girl)मृतदेह ट्रॅव्हल बॅगमध्ये (Dead body in bag)नायगावला सापडल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. ही मुलगी अंधेरीतील राहणारी आहे. जुहूच्या एका झोपडीत तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे. या अल्पवयीन तरुणीचा 21 वर्षांचा मित्र आणि जुहूत ज्या झोपडीत (Hut in Juhu) हा प्रकार झाला, त्या झोपडीत राहणारा त्याचा सहकारी हे दोघेही या प्रकारातील संशयीत आरोपी आहेत. या सगळ्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. एखाद्या सिनेमातील प्रसंगाप्रमाणे या मुलीची हत्या करुन, तिचा मृतदेह एका बॅगमध्ये भरण्यात आला आणि ती बॅग नायगावपर्यंत नेण्यात आली.

हत्येचं शस्त्रही पोलिसांनी केलं जप्त

ज्या शस्त्राने या पंधरा वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली, ते शस्त्रही पोलिसांनी या झोपडीतून ताब्यात घेतलं आहे. तसेच या हत्येनंतर फरार झालेल्या संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांची टीम गुजरातमध्ये गेल्याची माहितीही तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये या मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की, अत्यंत निर्घृणपणे या मुलीचा खून करण्यात आला. तिच्या ओटीपोटात किमान 12 वेळा भोसकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

इयत्ता नववीची होती विद्यार्थिनी

ही 15 वर्षांची मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. विलेपार्लेच्या एका शाळेत तिचे शिक्षण सुरु होते. एके दिवशी शाळेतून संध्याकाळी सव्वा सहा झाले तरी ही मुलगी घरी आली नाही. त्यानंतर तिच्या पालकांनी 25 ऑगस्ट रोजी ती हरवली असल्याची तक्रार अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. दरम्यानच्या काळात वालीव पोलिसांना एका मुलीचा मृतदेह बॅगमध्ये भरलेल्या अवस्थेत नायगावच्या पेरियार नगर परिसरात सापडला होता. मृतदेहाच्या जवळच त्या मुलीचे शाळेचे दप्तही सापडले होते. त्या दप्तराच्या आधाराने पोलीस तिचा शोध घेत शाळेत आणि नंतर तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचले.

हे सुद्धा वाचा

तिचा 21 वर्षांच्या संशयीत मित्रही फरार

ज्यावेळी ही मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिली, त्यावेळी तिचा 21  वर्षांचा मित्र असल्याची माहिती त्यांनी दिली नव्हती. हा तरुण वांद्रे पूर्व परिसरात राहणारा आहे. हा तरुण कॅटरिंगच्या व्यवसायात असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही. या तरुणाबाबत संशय आल्याने पोलिसांची टीम त्याच्या घरी पाठवण्यात आली. मात्र हा तरुणही दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या घरातल्यांनी दिली आहे. याबाबत निर्मल नगर पोलिसांत संपर्कही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जुहूच्या झोपडीपर्यंत धागेदोरे

पोलिसांनी त्यानंतर या तरुणाच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यात त्यांना त्याचा जुहूच्या झोपडीत राहत असलेल्या साथीदाराची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस जुहूतील मोरा गाव येथील त्याच्या साथीदाराच्या झोपडीपर्यंत पोहचले. पोलीस पोहचले तेव्हा झोपडीला कुलुप होते. त्यांनी कुलूप फोडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना जमिनीवर रक्ताचे डाग सापडले. या हत्याराने मुलीचा खून करण्यात आला होता, ते हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेह बॅगमध्ये भरुन तो लोकलने नायगावला नेण्यात आला. ही बॅग घेतलेला बांद्रातील तरुणाची ओळख स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरात झाली आहे.

सोशल मीडियावर मैत्री, हत्येचा प्लॅन

ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलसांनी व्यक्त केला आहे. ही मुलगी आणि बांद्र्यातील तरुण यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. महिनाभरापूर्वी त्याला भेटण्यासाठी ती घराबाहेर पडली आणि थेट दुसऱ्या दिवशीच घरी आली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती घरी परतली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. तिला शाळेतून नेण्या आणण्यासाठी रिक्षाही लावून देण्यात आली होती.

लैंगिक शोषण झाले का, शोध सुरु

या मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम जेजे हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. त्यानंतर या मुलीचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी तिच्या कुटुंबीयांना देण्यात आला आहे. या मुलीचे मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.