आमदारांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवा, हृदयविकाराचा झटका नाही आला म्हणजे झाले, संजय राऊत यांची कोपरखळी
आम्ही तुरुंगवास भोगले. रक्त सांडले. आता आम्ही सभ्य झालो आहोत. आम्हाला पुन्हा आवाहन देऊ नका, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईसाठी 105 हुतात्मे द्यायची तयारी उद्धव साहेबांची आहे. तेव्हा पाहिला हुतात्मा मी असेल.
राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी होऊन आठवडा पूर्ण झाला आहे. त्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावर जोरदार टोलेबाजी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यास काही लोकांना हृदयविकाराचा झटका आला नाही म्हणजे झाले, अशी कोपरखळी राऊत यांनी केली.
काय म्हणाले संजय राऊत?
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर एकनाथ शिंदे नाराज आहे? त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे यांच्या नाराजीला कोण विचारते. त्यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. हे सर्व कळसूत्री बाहुली आहेत. हे सर्व गुलाम आहेत. गुलामांना बंडाची भाषा शोभत नाही. त्यांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे. पण ते डरपोक लोक आहेत. काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या बदल्यात हृदयविकाराचा झटका आला नाही म्हणजे झाले. पण त्यांच्यासाठी रुग्ण वाहिका ठेवल्या पाहिजेत, असे राऊत यांनी म्हटले.
पहिला हुतात्मा मी असणार
आम्ही तुरुंगवास भोगले. रक्त सांडले. आता आम्ही सभ्य झालो आहोत. आम्हाला पुन्हा आवाहन देऊ नका, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईसाठी 105 हुतात्मे द्यायची तयारी उद्धव साहेबांची आहे. तेव्हा पाहिला हुतात्मा मी असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संजय राऊत म्हणाले, आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेलेल्या नाहीत. आम्ही कोणताही निर्णय घेताना तीन पक्ष एकत्र बसून घेतो. आम्ही जो निर्णय घेऊ तो निर्णय घेताना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते असतील. तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतली.
राज्यातील प्रश्न वेगळे, राष्ट्रीय प्रश्न वेगळे आहेत. त्यानुसार विचारपूर्वक मतदान करायचे असते. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आतापर्यंत घेऊ शकलेला नाहीत. कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटत होती. एक देश एक निवडणूक हे बिल तुम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केले. पण मी जबाबदारीने बोलतो. 2019 ला वन नेशन वन इलेक्शन हा फंडा असताना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का? असा मला प्रश्न आहे.