VIDEO: कोण ढोकळा विकतो ते सोडा, वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; सोमय्यांचं राऊतांना आव्हान
कोणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किरीट सोमय्यांचा मुलगा चणे, शेंगदाणे विकतो का?, भाजपवाल्यांची मुले केळी विकतात का?, अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?
मुंबई: कोणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किरीट सोमय्यांचा मुलगा चणे, शेंगदाणे विकतो का?, भाजपवाल्यांची (BJP) मुले केळी विकतात का?, अमित शहांचा (amit shah)मुलगा ढोकळा विकतो का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya)यांना केला होता. त्यावर सोमय्या यांनी पलटवार केला आहे. कोण ढोकळा विकतो आणि कोण काय करतो ते सोडा. तुम्हाला वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते आधी सांगा, असं आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तुमच्या कुटुंबात कधी कोणी उद्योग केला नाही. चोपड्यात एक दमडीही दिली नाही. मग अशोक गर्गन यांनी तुम्हाला पार्टनरशीप दिलीच कशी? असा सवालही सोमय्या यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना संजय राऊतांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. राऊत यांच्या कुटुंबातील कोणीही उद्योग-व्यवसायात नाही. मग अशोक गर्ग यांनी त्यांना पार्टनरशीप कशी दिली? राऊत यांनी उद्धव ठाकरेंसोबत सेटलमेंट घडवून आणलीय का? पडद्या मागे काय लपवत आहात. या वाईन उद्योगाची 100 कोटींची उलाढाल आहे. त्याचे लाभार्थी कोण आहेत? कोण ढोकळा विकतो, कोण केळी विकतो हे ढोंग बंद करा. पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं.
महापौरांनी उत्तर द्यावं
यावेळी त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही हल्ला केला. दहिसर कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये एकही रुग्ण आला नाही. पण लाखो रुपयांचे पेमेंट झालं आहे. शिवसेना नेते आणि पालिका आयुक्तांनी आकडे फुगवून दाखवले. ओमिक्रॉनबाबत बोंबाबोंब केली. लाट आल्याचं सांगितलं. नातेवाईकांना कंत्राटं दिली. त्याचं उत्तर महापौर किशोरीी पेडणेकर यांनी द्यावं. मी हे सगळे घोटाळे बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरेंची बोलती बंद झाली
यावेळी त्यांनी अनिल देशमुख प्रकरणावरही भाष्य केलं. सीताराम कुंटे यांनी कबुली दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बोलती बंद झाली आहे. बदल्यांच्या नावाखाली वसुलीचं रॅकेट सुरू आहे. या सरकारने सर्व आरोप स्वीकारले आहेत. आता उडवाउडवीची उत्तरे देत आहे. या प्रकरणावर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांननी उत्तर द्यावं. अनिल परबांवर कारवाई कधी होणार हे सांगावं, असं ते म्हणाले.
चार महिन्यांपूर्वीच वॉर्ड संख्या वाढवायची
महापालिका वॉर्डांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वॉर्डांची संख्याच वाढवायची होती तर चार महिन्यांपूर्वीच वाढवायची होती. मुंबईत शिवसेना साफ होणार यामुळे उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा उठला. त्यामुळेच हा प्रकार सुरू आहे, असं सांगतानाच पुण्यात अजित पवार प्रशासक होणार असून मुंबईत उद्धव ठाकरे प्रशासक होणार आहेत. मातोश्रीतून वसुली सुरू होणार आहे. कंत्राटदार ठरवले जाणार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा
पठ्ठ्याला बॅनरबाजी भोवली, निवडणुकीसाठी बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल!