संजय राऊतांची वाईन व्यवसायात गुंतवणूक, बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

महाविकास आघाडीने राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. त्याला भाजपने कडाडून विरोध केला आहे, तर आघाडीने मात्र त्याचं समर्थन केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वाईन विक्रीच्या निर्णयाचं स्वागत करताना वाईन म्हणजे दारू नसल्याचं म्हटलं होतं.

संजय राऊतांची वाईन व्यवसायात गुंतवणूक, बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
संजय राऊतांची वाईन व्यवसायात गुंतवणूक, बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:43 AM

मुंबई: महाविकास आघाडीने  (mahavikas aghadi) राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन (wine) विक्रीस परवानगी दिली आहे. त्याला भाजपने कडाडून विरोध केला आहे, तर आघाडीने मात्र त्याचं समर्थन केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वाईन विक्रीच्या निर्णयाचं स्वागत करताना वाईन म्हणजे दारू नसल्याचं म्हटलं होतं. राऊत यांच्या या दाव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट राऊतांवरच हल्ला केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगासोबत संजय राऊत यांची पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच राऊतांनी आपले आरोप खोडून दाखवावेच असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात वाईन म्हणजे दारू नव्हे. मग वाईन म्हणजे काय आहे? राऊत साहेब वाईन म्हणजे काय आहे? आपला आणि वाईनचा संबंध काय? किरीट सोमय्यांचा आणि वाईनचा दमडीचाही संबंध नाही. मी आयुष्यात कधी अंडी खाल्ली नाही. बिडीही ओढली नाही. सिगारेट नाही. वाईन नाही आणि बियरही नाही. तुमचा संबंध काय आहे. संजय राऊत कुटुंबाने काही महिन्यापूर्वी वाईन व्यवसायातील मोठ्या उद्योगपतीशी बिझनेस पार्टनरशीप सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंच्या सर्व सहयोगी आणि ठाकरे सरकारचे कारनामे फक्त न् फक्त पैसे गोळा करणं आहे. महाराष्ट्राला मद्य राष्ट्र बनवायला निघाले आहेत. राऊतांनी सांगावं किती महिन्यांपूर्वी तुम्ही मॅगपी ग्रुप अशोक गर्ग यांच्या बरोबर तुम्ही बिझनेस पार्टनरशीप केली. राऊतांनी सांगावं त्यांची पत्नी आणि कन्या किती व्यवसायात ऑफिशियल पार्टनर आहे. किती व्यवसायात जॉईंट व्हेंचर केलं आहे, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

महसूल नक्की वाढणार, पण

ठाकरे सरकारने 28 जानेवारी 2022 रोजी सुपरमार्केट व विभिन्न दुकानांमध्ये वाईन विक्री, व्यवसायाची सूट देण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच संजय राऊत म्हणतात वाईन आणि दारूमध्ये फरक आहे. राऊत म्हणतात ते खरं आहे. महसूल (Revenue) निश्चित वाढणार आहे. महाराष्ट्र सरकारचा आणि राऊत परिवाराचा सुद्धा, असा टोला त्यांनी लगावला.

सोमय्यांचे आरोप काय?

1) अशोक गर्ग यांची मॅगपी ग्लोबल लिमिटेड ही कंपनी 2006 मध्ये स्थापन झाली.

2) अशोक गर्ग यानी 12 जानेवारी 2010 रोजी मॅगपी डी एफ एस या कंपनीची स्थापना केली.

3) या दोन्ही कंपन्यांचा मुख्य व्यवसाय हॉटेल, क्लब, पब्स आदी ठिकाणी वाईन वितरीत करण्याचा आहे.

4) 16 एप्रिल 2021 रोजी संजय राऊत परिवाराने अशोक गर्ग यांच्या मॅगपी समुहाबरोबर भागीदारी (Partnership) साठी सह्या केल्या,

5) विधिता संजय राऊत व पूर्वशी संजय राऊत या संजय राऊत यांच्या दोन्ही कन्या मॅगपी डी एफ एस कंपनीच्या संचालक (Director) झाल्या.

6) अशोक गर्ग यांच्या मॅगपी समूहाचा वाईन व्यवसायाची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांची आहे.

7) संजय राऊत यांच्या कन्या फक्त दोनच कंपन्यांमध्ये संचालक आहेत. राऊत एन्टरटेन्मेंट ( ज्या कंपन्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा काढला होता). आणि दुसरी कंपनी म्हणजे मेगपी कंपनी

8) मेगपी कंपन चे ओरिजनल / मूळ नाव होते “मादक प्रायव्हेट लिमिटेड” कंपनी

संबंधित बातम्या:

शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही, युतीच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला; संजय राऊतांनी रोखठोक ठणकावले

Rajesh Tope :तज्ज्ञांच्या मते कोरोना मार्चच्या मध्यावधीपर्यंत संपुष्टात येणार, राजेश टोपेंनी नेमकं काय सांगितलं?

Budget 2022: स्टॉक मार्केट आणि म्यूचुअल फंड गुंतवणूकदारांनी, अर्थमंत्र्यांकडे केली ही मागणी, गुंतवणूकदार यांनी लक्षात ठेवाव्यात काही गोष्टी!!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.