मुंबईत लसीकरण केंद्राबाहेर 2 किलोमीटरपर्यंत रांगा; महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. (kishori pednekar reaction on Long queues of outside vaccination centre in Mumbai)

मुंबईत लसीकरण केंद्राबाहेर 2 किलोमीटरपर्यंत रांगा; महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं 'हे' आवाहन
kishori pednekar
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 11:34 AM

मुंबई: मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. लसींचा तुटवडा असल्याने आपल्यालाच लस मिळावी म्हणून नागरिकांनी पहाटे 7 वाजल्यापासून केंद्रावर गर्दी केल्याने दोन किलोमीटरपर्यंत ही रांग गेली आहे. त्यांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे, त्यांनाच प्राधान्याने डोस दिला जाणार असल्याचं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. (kishori pednekar reaction on Long queues of outside vaccination centre in Mumbai)

गोरेगावच्या नेस्को केंद्रावर आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स केंद्रावर नागरिकांची गर्दी झाल्याने त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वांनाच व्हॅक्सिन मिळणार आहे. लस जशी उपलब्ध होईल, तशा लस देण्यात येणार आहेत. गोरेगावच्या नेस्को केंद्रावरील गर्दी चिंताजनक आहे. नागरिकांनी प्रत्येक सेंटरवर अशी गर्दी केली तर बाधित होण्याची शक्यता अधिक आहे. गर्दीत एखादा व्यक्ती जरी बाधित असेल तर दुसऱ्यांना लागण होऊ शकते. त्यामुळे ज्या कारणासाठी लसीकरण होतंय ते बाजूला राहिल. म्हणून नागरिकांनी बोलावल्याशिवाय केंद्रावर येऊ नये, असं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.

नोंदणी केली तरच सेंटरवर या

कोविन अॅपवर नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही हे नागरिकांना आम्ही सोशल मीडिया, पालिकेच्या माध्यमातून कळवले आहे. पण लोक सरसकट रस्त्यावर आले आहेत. मुंबईत रणरणतं उन आहे. या उन्हाचा त्यांना तडाखा बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. नोंदणीशिवाय कोणत्याही सेंटरवर जाऊ नका, असंही त्या म्हणाल्या.

दुसऱ्या डोसवाल्यांना प्राधान्य

लस देणं जेवढं आम्हाला बंधनकारक आहे. तेवढंच नागरिक म्हणून स्वयंशिस्त पाळणंही बंधनकारक आहे, असं सांगतानाच मी स्वत: नेस्को केंद्रावर जाऊन माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच येणार्या व्हॅक्सीनचा पहिला डोस हा दुसऱ्या डोसवाल्यांनाच देण्यात येणार आहे. त्यांचे डोस पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. दुसऱ्या डोसवाल्यांना डोस दिल्यानंतर पहिल्या डोसवाल्यांना डोस दिला जाईल, असंही त्या म्हणाल्या.

दोन किलोमीटरपर्यंत रांगा

दरम्यान, गोरेगावच्या नेस्को आणि वांद्रे येथील बीकेसी कोविड केंद्रावर आज सकाळीच नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. गोरेगावच्या केंद्रावर तर दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. रणरणत्या उन्हात लोक उभे आहेत. त्यात बुजुर्ग नागरिक आणि महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. (kishori pednekar reaction on Long queues of outside vaccination centre in Mumbai)

संबंधित बातम्या:

मुंबईत अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली, एक हजार ऑक्सिजन बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटर वाढवणार

Maharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणीत लसींचा खडखडाट

कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा; संजय राऊत यांची मागणी

(kishori pednekar reaction on Long queues of outside vaccination centre in Mumbai)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.