Lata Mangeshkar Corona Positive | गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

Lata Mangeshkar भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे 

Lata Mangeshkar Corona Positive | गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल
लता मंगेशकर
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 12:54 PM

Lata Mangeshkar Corona Positive : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची (Lata Mangeshkar) लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. लता मंगेशक यांचं वय 92 वर्ष असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आल्याचं कळतंय

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळं खबरदारी घेण्यात येत असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर यांचं वय पाहता होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल

लता मंगेशकर यांचं सध्याचं वय 92 वर्ष आहे. त्यांच्या वयाचा विचार करता लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. लता मंगेशकर यांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचं कळतंय. लता मंगेशकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांना कोरोनाची लक्षण सौम्य स्वरुपात जाणवत आहेत. लतादिदी यांचं स्थान सर्वांच्या ह्रदयात आहे. डॉक्टर त्यांची काळजी घेतील, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

यापूर्वी 2019 मध्ये रुग्णालयात दाखल

लता मंगेशकर यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे उषा मंगेशकर यांनी सांगितले होते.

लता मंगेशकर यांचा अनेक पुरस्कारांनी सम्मान

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची 92 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. 1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी 1948 ते 1974 या काळात 25,000 हून अधिक गाणी गायली आहेत.

इतर बातम्या:

लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय, मग लस घ्यावी का? लसीचा एक डोस घेतल्यावर काय होतं?

किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु, 10 ते 12 वयोगटातील मुलांना का लस नाही? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

Lata Mangeshkar tested corona positive admitted to Mumbai breach candy hospital

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.