Lata Mangeshkar health update : लतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.

Lata Mangeshkar health update : लतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती
लतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:55 PM

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर (Breach candy hospital) पत्रकार परिषद घेऊन डॉ. प्रतीत समदानी यांनी ही माहिती दिली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे उपस्थित होते. लता मंगेशकर यांची आज अचानक तब्येत बिघडली होती. त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही डॉक्टरांकडून सांगितलं जात होतं. त्यामुळे लतादीदींच्या चाहत्यांनीही रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली होती. मीडियाच्या प्रतिनिधींनीही ब्रीच कँडीत धाव घेतली होती. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही ब्रीच कँडीला दाखल झाले होते. त्यामुळे लतादीदींच्या प्रकृतीबाबत अधिकच चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, काही वेळी पूर्वी डॉक्टरांनी मीडियाशी संवाद साधला आणि लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं.

ब्रीच कँडिचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन लता दीदींच्या प्रकृतीची माहिती दिली. लतादीदी ब्रीच कँडित अॅडमिट आहेत. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. त्या प्रोसेजरला टॉलरेट करत आहेत, असं समदानी यांनी सांगितलं. त्यानंतर डॉक्टर तात्काळ निघून गेले. त्यांनी मीडियाच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणं टाळलं.

राज ठाकरे सव्वा तासांपासून रुग्णालयात

दरम्यान, लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. राज यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन लतादीदींच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच मंगेशकर कुटुंबीयांसोबत संवाद साधून लतादीदींच्या प्रकृतीबाबतची माहिती घेतली. गेल्या सव्वा तासापासून राज ठाकरे हे रुग्णालयातच आहेत. काही वेळा पूर्वी राज ठाकरे रुग्णालयाच्याच खाली आले होते. त्यामुळे ते मीडियाशी संवाद साधतील असे वाटत होते. मात्र त्यांनी मीडियाशी संवाद साधला नाही. त्याऐवजी डॉक्टरांनी अगदी मोजक्याच शब्दात मीडियाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.

श्वसनास त्रास

दरम्यान, आज सकाळी लता मंगेशकर यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तात्काळ आयसीयूत दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली होती.

संबंधित बातम्या:

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास, व्हेंटिलेटरवर ठेवले

कॉमेडीचं टीव्हीवर सोडू, राजकिय सामाजिक काम करत राहू; अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं,डॉक्टरांची माहिती

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.