kalyan lok sabha constituency: पाच वर्षांत श्रीकांत शिंदे यांच्या मालमत्तेत १३ कोटींनी वाढ

kalyan lok sabha constituency: कल्याण लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर कर्ज हीआहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर १ कोटी ७७ लाख ३६ हजार ५५० तर वृषाली शिंदे यांच्यावर ४ कोटी ८५ लाख ८३ हजार ८९३ रुपये कर्ज आहे.

kalyan lok sabha constituency: पाच वर्षांत श्रीकांत शिंदे यांच्या मालमत्तेत १३ कोटींनी वाढ
खासदार श्रीकांत शिंदे
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 8:05 AM

लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक रंगतदार लढत बारामती आणि कल्याण लोकसभा मतदार संघात होत आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे. परंतु कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत आहे. त्यातच ‘बिग बॉस’ अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे लढत अधिकच रंगतदार होणार आहे. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या उमदेवारी अर्जासोबत संपत्तीचे विवरण जोडले आहे. त्यानुसार पाच वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल १३ कोटी रुपयांनी वाढली आहे.

अशी वाढली संपत्ती

पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये श्रीकांत शिंदे मालमत्ता १ कोटी ६७ लाख ५९ हजार ५१५ इतकी होती. परंतु आता १४ कोटी ४३ लाख ८० हजार ७९० रुपयांची मालमत्ता त्यांची झाली आहे. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नावाने सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या गावात शेतजमीन आहे. तर त्यांची पत्नी वृषाली शिंदे यांच्या नावे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीन आहे. वृषाली शिंदे या कुडाळ तालुक्यात असलेल्या हुमरमाळा गावातील शेतकरी आहेत. तसेच वृषाली शिंदे यांच्या नावाने ठाण्यातील पाचपाखाडी येथे देव अशोका, कळवा येथे इंद्रायणी को-ऑप. सोसायटी आणि ठाण्यातील रहेजा गार्डन येथे अ‍ॅस्कोना अमाल्फी येथे सदनिका आहे.

श्रीकांत शिंदे यांच्याकडे वाहन नाही

श्रीकांत शिंदे यांच्याकडे स्वत:चे एकही वाहन नाही. निवडणूक घोषणापत्रात त्यांनी एकही वाहन नसल्याची माहिती दिली आहे. परंतु त्यांच्याकडे दागिने आहेत. श्रीकांत शिंदे यांच्याकडे ११ लाख ३४ हजार ५२९ रुपयांचे सोने आहे. ४ लाख ९७ हजार १३७ रुपयांची हिऱ्याची अंगठी त्यांच्याकडे आहे. १ लाख १० हजार ५०० रुपयांचे दोन घडयाळे त्यांच्याकडे आहे. त्यांची पत्नी वृषाली शिंदे यांच्याकडे दागिने आहेत. २२ लाख ८२ हजार ७२५ रुपयांचे सोने वृषाली शिंदे यांच्याकडे आहे. ७ लाख ५६ हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी आणि १ लाख ६३ हजार ८७२ रुपयांचे चांदीचे दागिने वृषाली शिंदे यांच्याकडे आहे. तसेच ३ लाख ४४ हजार १७ रुपयांचे दोन घडयाळे आहेत.

हे सुद्धा वाचा

पती-पत्नी दोघांवर कर्ज

श्रीकांत शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर कर्ज आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर १ कोटी ७७ लाख ३६ हजार ५५० तर वृषाली शिंदे यांच्यावर ४ कोटी ८५ लाख ८३ हजार ८९३ रुपये कर्ज आहे.

अशी आहे मालमत्ता

रोख रक्कम

  • श्रीकांत शिंदे ९९,०२१
  • वृषाली शिंदे १,४१,४५२

जंगम

  • श्रीकांत शिंदे ४,७९,६४,९२७
  • वृषाली शिंदे ३,३५,४३,८८५

स्थावर

  • श्रीकांत शिंदे २,३४,५४,०००
  • वृषाली शिंदे ३,९४,१७,९७८
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.