धकधक गर्ल माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार? अमित शाह येताच चर्चा; ‘सागर’वर काय घडलं?

भाजपचे नेते अमित शाह काल मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेतलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

धकधक गर्ल माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार? अमित शाह येताच चर्चा; 'सागर'वर काय घडलं?
madhuri dixit Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 9:14 AM

मुंबई | 24 सप्टेंबर 2023 : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल मुंबईत आले होते. लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी अमित शाह सपत्नीक मुंबईत आले होते. मुंबईत आल्यावर त्यांनी सर्वाात आधी आशिष शेलार यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली. यावेळी काय चर्चा झाली याचा तपशील मिळाला नाही, मात्र, या चर्चेनंतर माधुरी दीक्षित भाजपच्या तिकीटावर लढणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. त्यामुळे धकधक गर्ल खरोखरच निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमित शाह यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत मुंबई, पुणे, धुळे आणि जळगाव लोकसभा निवडणुकीवर मंथन झाल्याचं सांगितलं जात आहे. या मतदारसंघात तगडे उमेदवार देण्यावर चर्चा झाली. काही नेत्यांच्या नावांवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात. पण भाजपकडून या वृत्ताला दुजारा देण्यात आला नाही.

माधुरी आणि निकम यांच्या नावावर चर्चा

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भाजपकडून मुंबईतून माधुरी दीक्षित, जळगावमधून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर आणि धुळ्यातून प्रतापराव दीघावकर यांना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या चारही जणांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ते निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत की नाही हे पाहिलं जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या चारही नावावर झालेल्या चर्चेबाबत भाजपकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाह यांच्या कालच्या बैठकीत नक्की काय घडलं हे गुलदस्त्यातच आहे.

कुणाचा पत्ता कट होणार?

मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. एक लोकसभा मतदारसंघ ठाकरे, दोन शिंदे गट आणि तीन भाजपकडे आहेत. त्यापैकी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे खासदार आहेत.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मनोज कोटक, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. भाजपच्या ताब्यात मुंबईतील फक्त तीन मतदारसंघ आहेत. त्यामुळे भाजप माधुरी दीक्षित यांना कोणत्या मतदारसंघात उभं करणार? आणि त्यासाठी कुणाचा पत्ता कट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.