AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking : आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला सर्वाधिक जागा?; वंचित आत की बाहेर?

लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागलं आहे. या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जोर बैठका सुरू आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जागा वाटपांचीही बोलणी सुरू केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीनेही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवल्याचं वृत्त आहे. या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीने फक्त एकाच नव्या मित्र पक्षालासोबत घेतलं आहे. इतरांसाठी जागा सोडलेल्या नाहीत.

Big Breaking : आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला सर्वाधिक जागा?; वंचित आत की बाहेर?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 24, 2023 | 2:11 PM
Share

मुंबई | 24 डिसेंबर 2023 : देशात केव्हाही लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला आहे. या फॉर्म्युल्यात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीलाही महाविकास आघाडीने जागा सोडल्या आहेत. त्यामुळे वंचित आघाडीचा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यशस्वी वाटप केलं आहे. आघाडीने त्यासाठी एक फॉर्म्युला ठरवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाला 20, शरद पवार गटाला 10 आणि काँग्रेसला 16 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीला दोन जागा सोडण्यात आला आहे. वंचितला सोडण्यात आलेल्या जागेमध्ये अकोल्याच्या जागेचा समावेश आहे.

ठाकरे गटाला सर्वाधिक जागा का?

महाविकास आघाडीने ठाकरे गटाला सर्वाधिक जागा सोडल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबत राज्यात सहानुभूती आहे. या सहानुभूतीचा फायदा करून घेण्यासाठी ठाकरे गटाला 20 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर वंचितचाही राज्यभरात प्रभाव असल्याने वंचितला एक ऐवजी दोन जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांच्यासाठी एकही जागा सोडण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे.

ठाकरेंचे उमेदवार निश्चित

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाने 20 जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. विद्यमान खासदारांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. तसेच इतर जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच मुंबईतून ठाकरे गट कुणाला उमेदवारी देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच ठाकरे गटाने ठाण्यासाठी काय डावपेच आखले याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

असं ठरलं जागा वाटप…

ठाकरे गट – 20 शरद पवार – 10 काँग्रेस -16 वंचित आघाडी – 2

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.