सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली वाढल्या, मुंबईत मोठ्या घडामोडी, पडद्यामागे नेमकं काय सुरुय?

महाविकास आघाडीच्या गोटात अचानक हालचाली वाढू लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची उद्या मुंबईत अचानक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली वाढल्या, मुंबईत मोठ्या घडामोडी, पडद्यामागे नेमकं काय सुरुय?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 4:47 PM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष चांगलेच कामाला लागले आहेत. विरोधी पक्षांच्या गोटात प्रचंड हालचाली घडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटाने सत्तेत सहभागी होऊन आता एक महिना पार पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अजित पवार यांच्या गटाच्या विरोधात आहेत. ते महाविकास आघाडीसोबत आहेत. तरीही ते नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रामाला हजर राहू नये, अशी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भावना होती. पण तरीही पवार आजच्या कार्यक्रमाला हजर राहीले.

या सगळ्या घटनांचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम पडलेला नाही. कारण महाविकास आघाडीच्या गोटात आता वेगाने घडामोडी घडायला सुरुवात झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांची आता मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ही बैठक तीनही पक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक असणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार

महाविकास आघाडीच्या आमदारांची 2 ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ही बैठक मुंबईच्या चर्चगेट येथील एमसीए लाँग येथे पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना उबाठा पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती या बैठकीचे संयोजक आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत देशभरातील अनेक विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र येत आहेत. विरोधकांच्या या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवण्यात आलं आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.