विधानसभा निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी किती जागांवर लढणार? स्वत: अजित पवार यांनीच सांगितला आकडा
ajit pawar meeting: विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरच होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८५ जागा विधानसभा घेणारच असल्याचा दावा अजित पवार यांनी बैठकीत केला. पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितले.
लोकसभेत पराभवाचा झटका बसल्यानंतर महायुतीलमधील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि मेळावे सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ८० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वत: अजित पवार यांनीच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच किती जागांवर उमेदवार उभे करणार? हे ही सांगितले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने ८५ जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. महायुतीमधील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार असल्याचे अजित पवार यांनी आमदारांना सांगितले.
जागावाटप लवकरच होणार
विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरच होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८५ जागा विधानसभा घेणारच असल्याचा दावा अजित पवार यांनी बैठकीत केला. पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सांगितले. तसेच यावेळी आमदारांना काय करावे आणि काय करु नये? यासंदर्भातील टीप्स दिल्या.
वादग्रस्त विधान टाळा
अजित पवार यांनी मित्र पक्ष सोबत वादग्रस्त विधान टाळा, असे सर्व आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते यांना बैठकीत सांगितले. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा. लाडली बहीण, बसमध्ये महिला अर्ध्या दारात तिकीट तसेच इतर लोक कल्याणकारी योजना जनतेसाठी महायुतीच्या सरकारने सुरु केल्या आहे. त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये करावा, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांचे पत्र
अजित पवार यांना सगळ्या विभाग आणि सेलचे लोकसभेचे अहवाल प्राप्त झाले आहे. या अहवालावर अजित पवारांकडून शेरा मारण्यात आला आहे. आपण लोकसभेत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी घेतलेले कष्ट स्पृहणीय आहे. आपण भविष्यात पण पक्ष संघटनेसाठी असेच काम कराल, ही अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचे विभाग आणि सेलच्या प्रमुखांना अहवाल प्राप्त झाल्यावर पत्र दिले आहे.