Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget Session 2023 LIVE : हक्कभंग प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ

| Updated on: Mar 09, 2023 | 6:45 AM

Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 LIVE Updates : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिकच गाजणार असल्याची चिन्ह आहेत.

Maharashtra Budget Session 2023 LIVE : हक्कभंग प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ
Maharashtra Budget SessionImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा आहे. आज विधानसभेत राज्यातील अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यासह राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा क्लिक करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Mar 2023 07:11 PM (IST)

    हक्कभंग प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ

    मुंबई :

    हक्कभंग प्रस्तावावर उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ

    संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे विनंती केल्यानंतर त्यांच्या विनंती दखल

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संजय राऊत यांना भूमिका मांडण्यासाठी मुदतवाढ दिली

  • 08 Mar 2023 06:09 PM (IST)

    राज्य अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित, ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल सादर

    मुंबई : 

    ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला.

    या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक म्हणजे 14 टक्के इतका आहे.

  • 08 Mar 2023 12:01 PM (IST)

    विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्य सरकारविरोधात निदर्शनं

    विधानसभेबाहेर विरोधी पक्षाकडून निदर्शनं

  • 08 Mar 2023 11:17 AM (IST)

    अवकाळी पावसाने नुकसान, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

    शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत… अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे…

    जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…

    बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…

    अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा तिसरा आठवडा आहे

    अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली

  • 08 Mar 2023 11:13 AM (IST)

    राज्यात 13 हजार 729 हेक्टर वरील शेतीचे नुकसान

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती,

    दुपारनंतर पुन्हा अडपेट माहिती घेऊन निवेदन केले जाणार,

    राज्यातील आठ जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती.

  • 08 Mar 2023 09:30 AM (IST)

    जागतिक महिला दिनानिमित्त विधान भवनात जागतिक महिला दिन साजरा

    विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विधानभवनातील प्रत्येक महिला कर्मचाऱ्यांना महिला दिवसानिमित्त शुभेच्छा पत्र , गुलाबाचे फूल आणि चॉकलेट दिलं जात आहे

    महिलांचं मनोबल वाढवण्याचे काम सध्या विधान भवनात होत असल्याचं पाहायला मिळतंय

  • 08 Mar 2023 09:28 AM (IST)

    शिंदे फडणवीस सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री पद नाही

    विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतात

    मुख्यमंत्र्यांकडून पाच मंत्र्यांची नावं विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुचवली जाणार

    विधानपरिषदेच्या उपसभापतींकडून एका नावावर होणार शिक्कामोर्तब

    विधानपरिषदेत खातं आणि जबाबदारी पाहून संधी मिळणार असणार असल्याची माहिती

    लवकरच नावं पाठवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती…

  • 08 Mar 2023 09:24 AM (IST)

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज चर्चा

    शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची विरोधकांची मागणी

    विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार

    सत्ताधारी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्याची शक्यता

Published On - Mar 08,2023 9:19 AM

Follow us
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.