AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांना कोरोना, मुंबई पोलीस दलात कोविडचा शिरकाव, बडे अधिकारी बाधित

राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना पोलीस देखील कोरोनाबाधित होत असल्याचं समोर आलं आहे.

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांना कोरोना, मुंबई पोलीस दलात कोविडचा शिरकाव, बडे अधिकारी बाधित
विश्वास नांगरे पाटील
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 2:04 PM
Share

मुंबई: राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना पोलीस देखील कोरोनाबाधित होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांना देखील कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे पुण्यात गेल्या आठ दिवसात 232 पोलिसांना कोरोना संसर्ग झालाय.

विश्वास नांगरे पाटील यांच्याह 18 अधिकारी कोरोनाबाधित

कोरोनाच प्रादुर्भाव वाढत असून मुंबई पोलीस दलातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सह संदीप कार्णिक, सत्यनारायण चौधरी, अतुल पाटील, दिलीप सावंत या चार अतिरिक्त पोलिस आयुक्तांना कोरोा झाला आहे.

13 पोलीस उपायुक्तांना कोरोना

एन . हरीबालाजी ( डीसीपी ) झोन 1 गीता चौहान ( डीसीपी ) पोर्ट झोन सोमनाथ घारगे ( डीसीपी ) झोन 12 दत्ता नालावड़े (डीसीपी ) अँटी नार्कोटिक सेल प्रकाश जाधव ( डीसीपी ) क्राइम नितिन पवार ( डीसीपी) ट्राफिक वेस्ट सुनील भारद्वाज ( डीसीपी ) LA4 एन अम्बिका ( डीसीपी ) विशाल ठाकुर (डीसीपी ) झोन 11 नियति ठाकर ( डीसीपी ) SB 2 बालकृष्ण यादव ( डीसीपी ) वायरलेस विजय पाटील ( डीसीपी) झोन 4 मंजूनाथ सिंगे ( डीसीपी ) झोन 4

पुण्यात 232 पोलीस कोरोाबाधित

पुण्यात गेल्या 8 दिवसात 232 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात 202 कर्मचारी आणि 30 पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पोलीस कोरोनाबाधित

भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर मार्च 2022 मध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं.त्यावेळी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर होती. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर पोलीस कोरोनबाधित झाले होते. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनासंसर्गामुळं जीव गमावला होता.

इतर बातम्या

Honda ची मोठी स्पेस असलेली कार, गाडीतली सीट घरातल्या बेडसारखी सरळ करता येणार

Tanaji Sawant Letter : एसटी विलीनीकरणाबाबत योग्य निर्णय घ्या, शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

Maharashtra Corona Mumbai Police Join CP Vishwas Nangare Patil and 17 other police officers tested corona positive

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.