11 जिल्ह्यात लेवल 3चे निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा, तुमचा जिल्हा आहे का? तपासा एका क्लिकवर

राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या 11 जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

11 जिल्ह्यात लेवल 3चे निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा, तुमचा जिल्हा आहे का? तपासा एका क्लिकवर
आरोग्य विभागातील भरतीबाबत राजेश टोपेंचे मोठे विधान
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 5:25 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेल्या आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तर राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या 11 जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. (Level 3 restrictions will remain in place in 11 districts of the state)

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध कायम?

पश्चिम महाराष्ट्र – पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर

कोकण – रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर

मराठवाडा – बीड

उत्तर महाराष्ट्र – अहमदनगर

लेव्हल 3 चे नियम

१. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

२. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

३. मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.

४. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार 50% बैठक क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी 4 वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.

५. उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..

६. सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.

७. खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.

८. कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) 50% क्षमतेने सुरू राहतील.

९. क्रीडा- सकाळी 5 वा.पासून सकाळी 9 वा./ सायं 6 वा. पासून सायं.9 पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.

१०. चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. ११ . सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक 50% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

१२. लग्न समारंभ फक्त 50 लोकांच्या मर्यादेतच करता येतील.

१३. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.

१४. बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या 50 टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.

१५. बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.

१६. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.

१७. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.

१८. जमावबंदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.

१९. व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.

२०. सार्वजनिक परिवहन सेवा 100% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

२१ . मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे 3 ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.

२२. खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.

२३. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.

२४. उत्पादनाच्या अनुषंगाने :

१. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)

२. सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)

३. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन

४. अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

इतर बातम्या :

25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम; राजेश टोपे यांची घोषणा

Maharashtra Corona Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक, मुंबई लोकलबाबत काय निर्णय होणार?

Level 3 restrictions will remain in place in 11 districts of the state

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.