Maharashtra Corona Update : राज्यात आजही कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजाराच्या पुढे, पुण्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 100 पार
आजही राज्यात 43 हजार 211 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 33 हजार 356 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. दुसरीकडे पुण्यात दिवसभरात 197 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई : राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची (Corona Patients) संख्या मागील काही दिवसांपासून 40 हजाराच्या पुढेच आहे. आजही राज्यात 43 हजार 211 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. दिवसभरात 33 हजार 356 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. दुसरीकडे पुण्यात दिवसभरात 197 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर राज्यातील ओमिक्रॉनबाधितांचा दिवसभरातील आकडा 238 इतका आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 43 हजार 211 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 33 हजार 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के इतके आहे. आज दिवसभरात 19 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 71 लाख 24 हजार 278 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातील 67 लाख 17 हजार 125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 61 हजार 658 आहे. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 रुग्ण होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 9 हजार 286 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात 238 ओमिक्रॉनबाधित रुग्ण
आज राज्यात 238 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 हजार 605 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 859 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. राज्यात आज आढळून आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांपैकी.
पुणे मनपा हद्दीत – 197 रुग्ण पिंपरी चिंचवड – 32 रुग्ण पुणे ग्रामीण, नवी मुंबई – प्रत्येकी 3 रुग्ण मुंबई – 2 रुग्ण अकोला – 1 रुग्ण
पुण्यात दिवसभरात 5 हजार 480 नवे रुग्ण
पुण्यात आज दिवसभरात 5 हजार 480 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 2 हजार 674 जणांचा डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यात शहातील 1 आणि पुण्याबाहेरील 2 अशा 3 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 208 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पुण्यात सध्या 28 हजार 542 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 5 लाख 48 हजार 469 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील 5 लाख 10 हजार 793 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण मृत्यू 9 हजार 134 इतके झाले आहेत.
पुणे कोरोना अपडेट : शुक्रवार, दि. १४ जानेवारी २०२२
◆ उपचार सुरु : २८,५४२ ◆ नवे रुग्ण : ५,४८० (५,४८,४६९) ◆ डिस्चार्ज : २,६७४ (५,१०,७९३) ◆ चाचण्या : २०,१४९ (४०,६८,३२१) ◆ मृत्यू : १ (९,१३४)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/04sQoTj4cn
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 14, 2022
इतर बातम्या :