बांधकाम मजुरांसाठी सरकारने तिजोरी उघडली, 4 दिवसात 137 कोटी 61 लाख थेट मजुरांच्या खात्यात जमा

कोरोनाचं संकट वाढल्याने राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. (Maharashtra Government release 137 cr for Building and Other Construction Workers)

बांधकाम मजुरांसाठी सरकारने तिजोरी उघडली, 4 दिवसात 137 कोटी 61 लाख थेट मजुरांच्या खात्यात जमा
हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार?
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 2:14 PM

मुंबई: कोरोनाचं संकट वाढल्याने राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या बांधकाम मजुरासाठी सरकारने मोठी आर्थिक मदत केली आहे. राज्य सरकारने या बांधकाम मजुरांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. गेल्या चार दिवसात 137 कोटी 61 लाखांचा निधी थेट मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तशी माहिती दिली आहे. (Maharashtra Government release 137 cr for Building and Other Construction Workers)

हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयाने एक प्रेसनोट काढली असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय 13 लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील 13 लाखांपैकी 9 लाख 17 हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अवघ्या 4 दिवसात 137 कोटी 61 लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

ऊर्वरीत कामगारांनाही अर्थसहाय्य मिळणार

सध्या राज्यात 1 मे 2021 पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नसल्याने कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित कामगारांना दीड हजार रुपयाचा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होत असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षीही कोविड -19 या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.

2 लाख कामगारांची आरोग्य तपासणी

त्याशिवाय या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मंडळाकडून योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत 2 लाख 3 हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्वच नोंदीत कामगारांची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

स्थलांतर करू नका

कोविड19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत पार्श्वभूमीवर मुंबई/ नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. (Maharashtra Government release 137 cr for Building and Other Construction Workers)

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा, हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; सुरजेवालांची खोचक टीका

LIVE | रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट, स्फोटानंतर केमिकल कंपनीला मोठी आग

(Maharashtra Government release 137 cr for Building and Other Construction Workers)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.