आमचा जन्मच मांसाहारासाठी झालाय : जितेंद्र आव्हाड

"आमचा जन्मच मांसाहार खाण्यासाठी झाला आहे. देशातील 90 टक्के लोक मांसाहार खाल्याशिवाय जीवंत राहू शकत नाहीत, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad slams BJP leader Kirit Somaiya) म्हणाले.

आमचा जन्मच मांसाहारासाठी झालाय : जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 11:55 PM

ठाणे : “आमचा जन्मच मांसाहार खाण्यासाठी झाला आहे. देशातील 90 टक्के लोक मांसाहार खाल्ल्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. तरीही गोहत्याबंदीच्या नावाखाली हे सरकार आमच्या खाण्याच्या अधिकारावर गदा आणत आहे”, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली (Maharashtra Housing Minister Jitendra Awhad slams BJP leader Kirit Somaiya). ठाण्यात आज (1 फेब्रुवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आंदोलकांना संबोधित करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली (Maharashtra Housing Minister Jitendra Awhad slams BJP leader Kirit Somaiya).

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी काल (31 जानेवारी) शहापूर येथील एका आदिवासी कुटुंबासोबत भोजन केलं होतं. याबाबत आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फोटो शेअर केले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर टीका केली होती. “आदिवासी कुटुंबासोबत शरद पवार मांसाहर खात आहेत आणि सोबत बिसलेरीचं पाणी पीत आहेत”, असा टोला त्यांनी लगावला होता. यालाच जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं.

“किरीट सोमय्या यांनी लिहून पाठवलं आहे की, गरीब आदिवासीच्या घरी गेला आणि चिकन खाऊन आला. गरीब आदिवासीदेखील चिकनच खातो कारण तेच आमचं खाद्य आहे. या देशातील 90 टक्के नागरिक मांसाहारशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. उद्या हे मोदी-शाह फापडा, जिलेबी आणि ढोकळा देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाहीत”, असा टोला आव्हाड यांनी भाजप नेत्यांना लगावला. “याशिवाय कोणताही मुस्लीम बांधव गायीचं मांस खात नाही”, असा दावा आव्हाड यांनी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.