फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय? नवाब मलिक भाजप नेत्यांवर भडकले

जे लोक महिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना मी विचारु इच्छितो, दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का?, असा उलट सवाल नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना विचारला.

फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय? नवाब मलिक भाजप नेत्यांवर भडकले
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 9:29 AM

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काल ट्विट करत अमृता फडणवीस यांच्याशी ड्रग्ज पेडलरचं कनेक्शन काय? असा सवाल करत जयदीप राणा आणि अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला होता. यानंतर भाजप नेते मलिकांवर तुटून पडले. अमृता फडणवीसांचं नाव घेतल्याने मलिक खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचे आरोप भाजप नेत्यांनी केले. यानंतर आज सकाळी 9 वाजताच पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय?, असा सवाल करताना भाजप नेत्यांनीही अजित पवार यांच्या बहिणींची नावं घेतली, माझ्या मुलीचं नाव घेतलं, असं ते म्हणाले.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती करणारे नवाब मलिक यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बॉम्ब फोडला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला. या फोटोत मिसेस फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या ट्विटनंतर भाजप नेते चांगलेच भडकले. महिलांवर हल्ला करणाऱ्या मलिकांचा निषेध व्यक्त करताना त्यांनी राजकारणाची पातळी सोडल्याची टीका भाजप नेत्यांनी केली. भाजपच्या डझनभर नेत्यांनी अमृता फडणवीस प्रकरणी काल मलिकांवर जोरदार टीका केली. आज त्यांच्या याच टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिक काय म्हणाले?

“जे लोक महिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना मी विचारु इच्छितो, दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? किरीट सोमय्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या आई-बहिणीविषयी उल्लेख केला. किरीट सोमय्या संजय राऊत यांच्या पत्नीविषयी बोलले. एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात जावं लागलं.सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीविषयी बोलतात. भाजपनं राजकारणाचा स्तर खाली नेलाय”, असा पलटवार नवाब मलिक यांनी केला.

तर “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाहीच, त्यामुळे फडणवीसांनी पुरावे नसताना केलेल्या आरोपामुळे त्यांनी आता माफी मागावी”, असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख नाही, वानखेडेंकडे पंचनामा मागा: नवाब मलिक यांचा पलटवार

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.