Maharashtra MP: खासदारांना निधी खर्चाचे वावडे; प्रीतम मुंडेंनी भोपळाही नाही फोडला, जळगावच्या पाटलांची बाजी

महाराष्ट्राच्या (Maharashtra) खासदारांना (MP) निधी खर्चाचे वावडे असून, आतापर्यंत त्यांनी मंजूर स्थानिक विकास निधीतील फक्त 45.38 टक्के पैसा खर्च केल्याचे समोर आले आहे. त्यातही बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी मंजूर अडीच कोटींच्या निधीपैकी एक नया पैसाही खर्च केला नसल्याचे समोर आले आहे.

Maharashtra MP: खासदारांना निधी खर्चाचे वावडे; प्रीतम मुंडेंनी भोपळाही नाही फोडला, जळगावच्या पाटलांची बाजी
प्रीतम मुंडे आणि उन्मेष पाटील.
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 10:54 AM

मुंबईः एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) खासदारांना (MP) निधी खर्चाचे वावडे असून, आतापर्यंत त्यांनी मंजूर स्थानिक विकास निधीतील फक्त 45.38 टक्के पैसा खर्च केल्याचे समोर आले आहे. त्यातही बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी मंजूर अडीच कोटींच्या निधीपैकी एक नया पैसाही खर्च केला नसल्याचे समोर आले आहे. मात्र, या निधी खर्चात जळगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांनी अव्वल नंबर पटकावला असून, त्यांनी मंजूर झालेल्या पाच कोटींपैकी 4.96 कोटी रुपये खर्च करून बाजी मारलीय. खासदारांची ही सारी कामगिरी दैनिक दिव्य मराठीने एका विशेष वृत्तातून समोर आणली आहे. त्यामुळे आपले खासदार आपल्या मतदार संघाचा विकास करण्यात खरेच किती उत्सुक आहेत, हेच नागरिकांसमोर आले आहे. त्यातही विशेष म्हणजे सर्वात कमी निधी खर्च केलेल्या खासदारांमध्ये मंत्री आणि जालन्याचे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचाही समावेश आहे.

कोणाची विकासाकडे पाठ?

बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी सर्वात कमी म्हणजे शून्य टक्के निधी खर्च केला आहे. त्यांना अडीच कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यानंतर दुसरा नंबर लागतो सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेशवर महाराज यांचा. त्यांना 5 कोटी 50 लाख मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी फक्त 50 लाख रुपये खर्च केलेत. त्यानंतर नंबर लागतो सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांचा. त्यांना 5 कोटी 39 लाखांचा निधी मंजूर झालाय. मात्र, त्यांनी फक्त 39 लाख रुपये खर्च केलेत.

दानवेंही राहिले मागे

मंत्री आणि जालना येथील भाजप खासदार रावसाहेब दानवे यांना 2.5 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र, त्यांनी फक्त 45 लाख रुपयांची विकासकामे केली आहेत. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना 5 कोटी 1 लाख 20 हजारांचा निधी मंजूरय. मात्र, त्यांनी फक्त 1 कोटी 20 लाखांची कामे केलीयत. यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना 5 कोटी 1 लाख 10 हजारांचा निधी मंजूर आहे. मात्र, त्यांनी फक्त 1 कोटी 10 लाखांचा निधी खर्च केलाय.

खर्चात कोणाची बाजी?

महाराष्ट्रातील निधी खर्चात अव्वल नंबर पटकावलाय तो भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांनी मंजूर झालेल्या पाच कोटींतील 4.96 लाखांचा निधी विकासकामांवर खर्च केला आहे. त्यानंतर लातूरचे भाजप खासदार सुधाकर शृंगारे यांचा नंबर लागतो. त्यांनाही पाच कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यांनी त्यापैकी 3.93 कोटी रुपये विकासकामांवर खर्च केली आहेत. भाजपचे मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार मनोज कोटक यांना 7 कोटींचा विकास निधी मंजूर झाला. त्यांनी त्यातील 4.77 कोटी रुपये खर्च केलेत.

रक्षा खडसेही आघाडीवर

जळगाव येथील भाजप खासदार रक्षा खडसे यांना 5 कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यांनी त्यापैकी 3.27 कोटी रुपये खर्च केले आहेत. सर्वाधिक निधी खर्चात भाजप खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, रामदास तडस आणि शिवसेना खासदार संजय जाधव, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचीही नावे आहेत.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.