Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या ‘राणा’चं निधन, पोटाचा विकारामुळे वयाच्या सातव्या वर्षी निधन

मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील एका श्वानाचं निधन झालं आहे.'राणा' असं या श्वानाचं नाव आहे.

Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या 'राणा'चं निधन, पोटाचा विकारामुळे वयाच्या सातव्या वर्षी निधन
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 8:42 AM

मुंबई: मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) श्वान पथकातून एक दुख:द बातमी आहे. मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील एका श्वानाचं निधन झालं आहे.’राणा’ (Rana Dog Death) असं या श्वानाचं नाव आहे. तो मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान राणाचं निधन झालं. राणाचं वय सात वर्षे सात महिने होतं. त्याने अनेक ठिकाणी बॉम्ब शोधण्याचं काम केलं. त्याच्या कामावर पोलीस अतूट विश्वास ठेवत. त्याच्या जाण्याने मुंबई पोलिसांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. 2016 मध्ये तो मुंबई पोलिसांच्या श्वानपथकात दाखल झाला. स्फोटकं शोधण्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर जानेवारी 2016 ला राणा पोलिसांच्या बॉम्ब शोधकपथकात दाखल झाला. राणा लॅब्रोडॉर जातीचा श्वान आहे. राणा मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकात दाखल झाला होता.

जेव्हापासून राणाने बॉम्ब कॉल, थ्रेट कॉल, संशयित वस्तू याची तपासणी करणण्याचं काम केलं. व्हीव्हीआयपी, व्हीआयपी यांची मुंबई भेटीदरम्यान घातपातविरोधी तपासणी करणं, संवेदन ठिकाणांची नियमित तपासणी करणं, अश्या घातपातविरोधी तपासणीमध्ये त्याचा सहभाग असायचा. राणा आहे म्हणजे निर्धास्त राहू शकतो, असा पोलिसांना विश्वास आसायचा. त्याने अनेक मोहिमा यशस्वी केल्या. राणाला पोटाचा विकार झाल्याने त्याच्यावर परळच्या बाई साकराबाई पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. राणावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उपचारादरम्यान निधन

मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातून एक दुख:द बातमी आहे. मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील एका श्वानाचं निधन झालं आहे.’राणा’  असं या श्वानाचं नाव आहे. तो मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान राणाचं निधन झालं. राणाचं वय सात वर्षे सात महिने होतं.  राणाला पोटाचा विकार झाल्याने त्याच्यावर परळच्या बाई साकराबाई पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.

हे सुद्धा वाचा

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मानवंदना देवून राणाला अखेरचा निरोप दिला. यावेळी शोकाकूल वातावरण पाहायला मिळाल.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.