ठाकरे सरकारचं महिला पोलिसांना गिफ्ट, कामाचे तास कमी करण्याचा निर्णय, आता फक्त 8 तासांची ड्युटी
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजय पाडे यांनी पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिलीय. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलं आहे .
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजय पाडे यांनी पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिलीय. महाराष्ट्र सरकारनं महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 तासांवरुन 8 तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संजय पांडे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलं आहे . चार तासांची ड्युटी कपात केल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Maharashtra govt has decided to reduce the working hours of women police personnel from 12 hours to 8 hours: Maharashtra DGP Sanjay Pandey
(File pic) pic.twitter.com/boa7jUJVtY
— ANI (@ANI) September 24, 2021
सुप्रिया सुळे यांच्याकडून निर्णयाचं स्वागत
महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) September 24, 2021
नागपूरमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तासाचा ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा अशी सूचना केली होती.त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली होती, त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारे अमरावती शहर पोलीस आयुक्त पोलीस तिसरे ठरलं होतं. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून संपूर्ण राज्यातील महिला पोलिसांना 8 तासांची ड्युटी करायला मिळणार आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव बंदोबस्त गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा 12 तासापेक्षा जास्त कर्तव्य बजावावं लागत. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले.आता चार तासाची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला आहे.
यशोमती ठाकूर यांच्याकडून स्वागत
महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. पोलीस महासंचालक पांडे आणि पोलीस दल, गृह विभानं महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतेय, असं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या:
Maharashtra Police DGP Sanjay Pandey said Maharashtra Government taken decision to reduce duty hours of woman police