Special Report | ‘त्रिवेदींना आता माफी मागण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही’, रोहित पवार यांचा इशारा

ज्या शब्दावरुन वाद निर्माण करण्यात आला, असं काही बोललोच नसल्याचं त्रिवेदींनी म्हटलंय. तर त्रिवेदींना आता माफी मागण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी दिलाय.

Special Report | 'त्रिवेदींना आता माफी मागण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही', रोहित पवार यांचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 10:55 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन, आता भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी स्पष्टीकरण दिलंय. ज्या शब्दावरुन वाद निर्माण करण्यात आला, असं काही बोललोच नसल्याचं त्रिवेदींनी म्हटलंय. तर त्रिवेदींना आता माफी मागण्याच्या लायकीचंही ठेवणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी दिलाय.

राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन, महाराष्ट्रात रोष शांत होत नाहीय. रोज कुठं ना कुठं आंदोलनं सुरु आहेत. आणि सुधांशू त्रिवेदींनी 3 दिवसांनी स्पष्टीकरण देत, आपण तसं बोललोच नसल्याचं म्हटलंय.

सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत, त्रिवेदींनी शिवरायांचाही उल्लेख केला. त्याकाळात माफीसाठी ठरलेल्या फॉरमॅटमध्ये पत्र लिहिलं जातं होतं. आणि शिवरायांनीही औरंगजेबला 5 वेळा पत्र लिहिल्याचं त्रिवेदी एका चॅनलवर म्हणाले. पण आता सुधांशू त्रिवेदींनी यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

तर सुधांशू त्रिवेदीचा हा खुलासा म्हणजे, मूर्खपणा आहे. मोदींनी त्रिवेदींची भाजपमधून हकालपट्टी करुन प्रायश्चित्त करावं, असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी म्हटलंय.

नागपुरात राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींच्या विरोधात काँग्रेसनं जोडेमारो आंदोलन केलं. नांदेडमध्येही काँग्रेसकडून महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. अहमदनगरच्या राहता मध्येही कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींचे पोस्टर जाळत निषेध करण्यात आला. कोल्हापुरात मनसेनं आंदोलन करत, कोश्यारींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला साडी नेसून बांगड्या आणि चपलांचा हार घातला.

भाजपकडून आशिष शेलारांनी आपण राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमत असल्याचं म्हटलंय. तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी पुन्हा राहुल गांधींच्या सावरकरांच्या वक्तव्याकडे बोट दाखवलंय.

इकडे औरंगाबादमध्ये कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आमनेसामने आलेत. राज्यपाल आणि त्रिवेदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जाधवांनी कन्नड बंदच आवाहन करताना, खैरेंवरही आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्यानंतर खैरेंनी जाधवांना सायको म्हटलंय.

वादानंतर त्रिवेदींनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकही आक्रमक आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.