हिस्ट्री रिपीट…; बाळासाहेब तेव्हा आणि आता उद्धव ठाकरे…. जीपवरून तडाखेबंद भाषण; खास ठाकरी शैलीत खडसावलं

उद्धव ठाकरे यांना रणरणत्या उन्हात ओपन जीपवर उभे राहून भाषण देत होते. उद्धव ठाकरे यांचा हा अवतार पाहून शिवसैनिकांना चटकन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठण झाली.

हिस्ट्री रिपीट...; बाळासाहेब तेव्हा आणि आता उद्धव ठाकरे.... जीपवरून तडाखेबंद भाषण; खास ठाकरी शैलीत खडसावलं
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 4:05 PM

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच हजारो शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर प्रचंड गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला शिवसैनिकांशी छोटासा संवाद साधला. पण त्यानंतरही शिवसैनिक काही हटायला तयार नव्हते. अखेर उद्धव ठाकरे दोन तासांनी पुन्हा बाहेर आले. यावेळी त्यांनी जीपवर उभं राहून खास ठाकरी शैलीत तडाखेबंद भाषण केलं. उद्धव ठाकरे जीपवर उभं राहून सत्ताधाऱ्यांवर अक्षरश: तुटून पडले होते. यावेळी शिवसैनिकांच्या मनात थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उमटली. बाळासाहेबांनीही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात जीपवर उभं राहून असंच तुफान भाषण करून मराठी अस्मितेला जागं करत मराठी मनामनात स्वाभिमानाची आग पेटवली होती. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय असं चित्र दिसत होतं.

शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दुपारी 1 वाजता शिवसेना आमदार, खासदार, उपनेते आणि नेत्यांची बैठक बोलावली होती. या सर्व नेत्यांना मातोश्रीवर येण्याचे निरोप धाडण्यात आले होते. पण नेत्यांच्या आधी सामान्य शिवसैनिक सकाळापासून मातोश्रीवर आला होता. जत्थ्या जत्थ्याने शिवसैनिक मातोश्री परिसरात जमा झाला.

हे सुद्धा वाचा

हजारो शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले आणि उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देऊ लागेल. यावेळी शिवसैनिकांनी महाराष्ट्र गीतही म्हटलं. उद्धव ठाकरे आगे बढोच्या घोषणाही सुरू झाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीच्या दरवाज्यात येऊन या शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांना पुन्हा जिद्दीने उभं राहण्याची साद घातली.

बैठक आणि खलबतं…

त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मातोश्रीत गेले. नेत्यांसोबत बैठका सुरू झाल्या. खलबतं सुरू झाली. पुढे काय करायचं? सर्वोच्च न्यायालयात कधी जायचं? कोणते मुद्दे उपस्थित करायचे? यावर खल झाला. अर्धा तास झाला… पाऊण तास झाला… एक तास झाला… दीड… दोन… अडीच तास झाले… बैठक सुरूच होती. अखेर बैठक संपत आली. उद्धव ठाकरेही बाहेर आले. शिवसैनिकाच्या घोषणा कमी होताना दिसत नव्हत्या. अडीच तासांपूर्वी जो जोश आणि उत्साह शिवसैनिकांमध्ये होता, तोच जोश आताही होता.

उद्धव ठाकरे बरसत होते अन्…

या शिवसैनिकांना शांत करण्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडे पर्याय नव्हता. कारण शिवसैनिक चिडलेला होता. संतापलेला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी थेट ओपन जीपवर उभं राहून आपल्या तडाखेबंद भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला माईकमधून आवाज येत नव्हता. पण उद्धव ठाकरेंना तमा नव्हती. समोर शिवसैनिक होता… त्याला काही सांगायचं होतं… त्यामुळे उद्धव ठाकरे बोलतच राहिले. सत्ताधाऱ्यांवर बरसत होते.

भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोग… प्रत्येकाची पिसे काढत होते. आपल्या खास ठाकरे शैलीत उद्धव ठाकरे बरसत होते. मध्येच धीर देत होते. संयम पाळण्याचं आवाहन करत होते. पुन्हा नव्या लढाईला सज्ज राहण्याचे आदेशही देत होते. एव्हाना घोषणा देणारा शिवसैनिक शांत झाला होता. कान देऊन उद्धव ठाकरे यांचं म्हणणं ऐकत होता. मध्येच जिंदाबादच्या घोषणा होतच होत्या… टाळ्यांचा कडकडाट होत होता…

अन् बाळासाहेब ठाकरे आठवले…

उद्धव ठाकरे यांना रणरणत्या उन्हात ओपन जीपवर उभे राहून भाषण देत होते. उद्धव ठाकरे यांचा हा अवतार पाहून शिवसैनिकांना चटकन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठण झाली. बाळासाहेबांनीही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात एका गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण केलं होतं.

अवती भोवती शेकडो शिवसैनिक आणि पँट शर्ट घातलेले बाळासाहेब जीपवरून भाषण करताना दिसत आहेत. गेट वे ऑफ इंडिया परिसरातील हा फोटो असल्याचं सांगितलं जातं. 30 ऑक्टोबर 1968मधील हा फोटो असल्याचं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणाने शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाल्या वाचून राहिली नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.