Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात पुन्हा ‘कोसळधार’ कधी? हवामान विभागाकडून सर्वात मोठी अपडेट

राज्यभरात सध्या पावसाने दडी मारलेली आहे. यावर्षी पाऊस हवा तसा पडताना दिसत नाहीय. अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण पाऊस येताना दिसत नाहीय. हवामान विभागाकडून महाराष्ट्रात कधी पाऊस येऊ शकतो, याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात पुन्हा 'कोसळधार' कधी? हवामान विभागाकडून सर्वात मोठी अपडेट
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 11:04 AM

नंदकिशोर गावंडे, Tv9 मराठी, मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रावर गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस रुसून बसलेला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक ठिकाणी पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. भर पावसाच्या मोसमात सूर्य आग ओकत असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचं धस्स झालंय. ते आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांनी अतिशय मनापासून, जीव लावून पेरणी केलीय. आता पीकं थोडीशी मोठी झाली आहेत. ती डुलायला लागली आहेत. त्यांना आता पावसाची निंतात गरज आहे. अन्यथा ही पीकं पुन्हा कोमेजून जाण्याची भीती आहे.

पाऊस असाच रुसून बसला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकतो. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहे. गेल्या महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलं. अनेक नद्यांना पूर आला. पण काही जिल्हे पावसापासून उपेक्षित राहिले. त्यांना हवा तसा पाऊस यावर्षी मिळालेला नाही. त्यामुळे या भागांमधील शेतकरी आणि इतर नागरीक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पावसाचं नसणं हे खूप भीषण असतं. त्यामुळे पावसाने खूप पडावं. सर्व नद्या दुथडी भरुन वाहाव्यात अशी आशा असते. पण यावर्षी पाऊस हवा तसा होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारपुढील देखील आव्हानं वाढताना दिसत आहेत. याशिवाय पाऊसच पडला नाही तर अन्नधान्य कसं उगवेल? आणि महागाई किती वाढेल? हे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे ही सर्व संकट उद्भवू नये म्हणून पावसाने पडायला हवं.

शेतकऱ्यांकडून देवाकडे पावसासाठी साकडं घातलं जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. खरं म्हणजे ही अपडेट निराशा करणारीच आहे. पण राज्यात आता पाऊस कधी येऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यासाठी पुढचे दोन आठवडे जास्त आव्हानात्मक असणार आहेत. कारण दोन आठवडे पावसाची शक्यता फार कमी आहे.

हवामान विभागाने नेमकं काय सांगितलंय?

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास सध्या फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे. 19 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात सध्या सामान्य स्थिती आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थितीचा अभाव आहे.

17 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. राज्यात या काळात सर्वदूर मोसमी पाऊस विश्रांती घेईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता

अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढून 18 किंवा 19 ऑगस्टपासून किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 25 ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुणे हवामान विभागाचे वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर पावसाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तसेच 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड येथे पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सरासरी इतका, किंवा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.