Maharashtra Vidhan Sabha Live : पु्न्हा राणे vs ठाकरे, मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात-निलेश राणे

| Updated on: Dec 25, 2021 | 1:04 AM

Maharashtra Vidhan Sabha Live : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज तिसरा दिवस आहे.

Maharashtra Vidhan Sabha Live : पु्न्हा राणे vs ठाकरे, मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात-निलेश राणे
Maharashtra Assembly Session live

Maharashtra Vidhan Sabha Live Day 3: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज तिसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील विधिमंडळ अधिवेशनात पहिल्या दोन दिवसात उपस्थित राहिले नाहीत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यासह भाजप नेते ठाकरे सरकारवर आजही हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Dec 2021 07:24 PM (IST)

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात- निलेश राणे

    निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. पण 1 दिवससुद्धा घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणास्तव पूर्णवेळ अधिवेशनाला उपस्थित नाहीत. त्यावरून भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

  • 24 Dec 2021 02:03 PM (IST)

    देशाच्या नागरिकांचा जीव महत्त्वाचा, निवडणुका पुढे जात असतील तर त्याची परवा करू नये: भाई जगताप

    ओमयक्रॉंच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने काही बाबी नमूद केल्या आहेत. – यामध्ये निवडणूका पुढे ढकलण्याबाबत त्यांनी टिप्पणी केली आहे. आमची विनंती आहे – देशाच्या नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. निवडणुका पुढे जात असतील तर त्याची परवा करू नये. – कारण नागरिकांचे जीव वाचणे महत्त्वाचं आहे. माजी रॅली 28 तारखेला होती परंतु आम्ही ओमायक्रॉंनची सुरुवात झाली होती. – त्यामुळे आम्ही लगेचचं ही रॅली पुढे ढकलली आहे. ज्यावेळी परिस्थिती सुस्थितीत येईल त्यावेळी आम्ही ही रॅली घेऊ

  • 24 Dec 2021 01:33 PM (IST)

    रामदास कदम विधानभवनाच्या गेटवर रोखल्यावर एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील तातडीनं बाहेर, अँटिजेन टेस्टनंतर सोडलं

    रामदास कदम यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली, ते निगेटिव्ह आल्यानंतर सोडण्यात आलं… सोमवारी यावर बोलणार

    रामदास कदम आज विधीमंडळ कामकाजासाठी आले होते

    मात्र त्यांच्याकडे रिपोर्ट नसल्याने त्यांना गेटवर अडवण्यात आले

    मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील तसेच शिवसेनचे आमदार त्यांना गेटवर आणण्यासाठी गेले

    त्यावेळी रामदास कदम याची अटीजेंन टेस्ट करून त्यांना सोडण्यात आलय

  • 24 Dec 2021 12:28 PM (IST)

    12 आमदारांच्या निलंबनावर विधानसभेत चर्चा सुरु

    विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमावरुन सुधीर मुनंगटीवार यांनी अनिल परब यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचं म्हटलं. तर, अनिल परब यांनी सुधीर मुनंगीटवर यांनी पत्रकारांच्या माहितीवर सभागृहात येऊन वक्तव्य करताय हे योग्य नाही. कार्यक्रम ज्यावेळी अध्यक्ष जाहीर करतील त्यावेळीचं तो अधिकृत असेल, असं म्हटलंय.

  • 24 Dec 2021 12:05 PM (IST)

    Nana Patole: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्लीन चीट द्यायचे, ते स्वत:ला न्यायाधीश समजायचे: नाना पटोले

    विधानसभा अध्यक्षपद मजबूत आणि अनुभवी माणसाला असलं पाहिजे असेल, असं महाविकास आघाडीचं मत आहे. हायकमांड काय निर्णय घेईल हे पाहावं लागेल. भाजपनं त्यांच्या काळात राज्यात अधिवेशन कसं चालवलंय हे जनतेनं पाहिलं आहे. नरेंद्र मोदी संसद कशी चालवतात हे देशानं पाहिलं आहे. विरोधकांनी काल आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. सत्ता गेल्यानं आलेला हताशपाणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नोकरभरती घोटाळ्यामध्ये पटवारी, कृषी सहाय्यक भरती घोटाळा सुरु झाला होता. सुखदेव डेरेला क्लिन चिट देण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस क्लीन चीट द्यायचे, ते न्यायधीश असल्यासारखं वागायचे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. विरोधकांचा फुसका बार निघाला आहे.

  • 24 Dec 2021 10:52 AM (IST)

    Sudhir Mungantiwar : ठाकरे सरकारकडून लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली

    संसदीय कामकाज मंत्री बाहेर विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत बोलतात. बीएसीच्या बैठकीत याबाबत एक शब्दही सांगितला गेला नाही. राज्य सरकार सुडाचं राजकारण करत असेल. 12 आमदारांना मताचा अधिकार न देता, बीएसीच्या बैठकीत अध्यक्षाची निवडणूक ही लोकशाहीच्या मूल्याची पायमल्ली करणार असाल तर ही योग्य नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • 24 Dec 2021 10:24 AM (IST)

    Nawab Malik : राजकारणापेक्षा जीव वाचवणं गरजेचं, भाजपला लोकांना मारून राजकारण करायचंय : नवाब मलिक

    नवाब मलिक आॅन चंद्रकांत पाटील –

    राजकारणापेक्षा जीव वाचवणं गरजेचं… लोकांचा जीव वाचवणं गरजेचं…

    – भाजपला लोकांना मारून राजकारण करायचंय…

    – दुखवट्याच्या नावाखाली काही लोक दिशाभूल करून तिथे बसवत आहेत, एखादा वकिल लोकांची दिशाभूल करत असेल, दिशाभूल करत असेल तर हे चालणार नाही… ( सदावर्तेंवर नाव न घेता टिका )

    – कर्माचारी नाही तर वकिल दिशाभूल करत आहे…

    – दिवस वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो,

  • 24 Dec 2021 10:16 AM (IST)

    Sudhir Mungantiwar: हे लोकशाहीचे मंदिर; अधिवेशन घेणे महत्वाचे: सुधीर मुनंगटीवार

    हे लोकशाहीचे मंदिर; अधिवेशन घेणे महत्वाचे: सुधीर मुनंगटीवार

    या अधिवेशनाचा कालावधी कोरोना कारण दाखवून कमी करण्याचा प्रयत्न केला

    आज शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य सेवा, मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय

    पेपर फुटी सारखे घाणेरडे कृत्य होत आहे. या सर्वांचे शंकांचे निरसन होण्याची एकच जागा आहे ती म्हणजे विधान भवन

  • 24 Dec 2021 09:18 AM (IST)

    Chandrakant Patil : पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार : चंद्रकांत पाटील

    विधिमंडळाचं अधिवेशन कमी वेळात उरकणं हे लोकशाहीला धरुन नाही. लोकशाहीची पायमल्ली करण्याचंच त्यांनी ठरवलं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय होतो ते पाहून आम्ही निर्णय घेऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. सगळी क्रोनॉलॉजी, घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. सीबीआय चौकशी नको म्हणताय तर कुठली तरी चौकशी लावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 24 Dec 2021 09:01 AM (IST)

    Maharashtra Assembly Winter Session Day 3 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस

    राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज तिसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे.

Published On - Dec 24,2021 8:57 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.