Weather Alert! पुढचे 48 तास मुंबईसह ‘या’ शहरांसाठी धोक्याचे, हवामान खात्याकडून इशारा

शिमग्या आधीच नवी मुंबई, मुंबई, कोकण तापायला सुरुवात झाली. खरंतर, यंदाही कोरोनाचं थैमान सुरू आहे. यातही उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Weather Alert! पुढचे 48 तास मुंबईसह 'या' शहरांसाठी धोक्याचे, हवामान खात्याकडून इशारा
वातवरणीय बदल
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 7:59 AM

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अशात आता पुन्हा कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. शिमग्या आधीच नवी मुंबई, मुंबई, कोकण तापायला सुरुवात झाली. खरंतर, यंदाही कोरोनाचं थैमान सुरू आहे. यातही उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (maharashtra weather update heat wave in mumbai navi mumbai thane weather report)

पुढील 48 तास उष्णतेची लाट मुंबईसह संपूर्ण कोकण प्रांतात कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. शुक्रवारसह शनिवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईसह पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील तापमानात वाढ होणार आहे असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

गुरुवारी दुपारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा 39 अंश एवढा नोंदवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस झाला आहे. पालघर इथे गुरुवार दुपारी कमाल तापमान 41 अंश नोंदवले गेले. यामुळे उन्हाचा पारा वाढून नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, हवामानातील उष्णता वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यामध्ये आरोग्याची आणि आहाराची काळजी घ्या. वेळीवेळी पाणी प्या, शरीराला थंड करणाऱ्य़ा भाज्या आणि फळं खा. जेवणाच्या वेळा पाळा आणि शरीराला त्रास होईल असं काहीही खाऊ नका. (maharashtra weather update heat wave in mumbai navi mumbai thane weather report)

संबंधित बातम्या –

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे दिलासा, वाचा तुमच्या शहरातले दर

1 लाख गुंतवून होईल 1 लाख 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं

देशात पुन्हा लॉकडाउन होणार का? RBI गव्हर्नर यांनी दिली महत्त्वाची माहिती

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

(maharashtra weather update heat wave in mumbai navi mumbai thane weather report)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.