Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न? रुपाली चाकणकर यांच्या ट्विटने खळबळ

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा आणि पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाच्या घटनेची रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पालघर भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न? रुपाली चाकणकर यांच्या ट्विटने खळबळ
rupali chakankar
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 9:30 PM

मुंबई | 15 डिसेंबर 2023 : भाजपच्या पालघर युवा मोर्चाच्या अध्यक्षाने त्याच्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. संबंधित प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. या प्रकरणातील पीडिता ही जखमी आहे. तसेच ती अत्यंत मानसिक तणावाखाली असल्याची माहिती स्वत: रुपाली चाकरणकर यांनी दिली आहे. रुपाची चाकणकर यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी पालघरचे पोलीस अधिक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी यांना पत्र पाठवून या प्रकरणाचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काय-काय माहिती येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या आहेत?

“महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा आणि पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागविला आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

चाकणकर यांच्याकडून नवी मुंबईच्या घटनेचीही दखल

रुपाली चाकरणकर यांनी आणखी एका प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र लिहिलं आहे. नवी मुंबईतील नेरुळ बस थांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या तरुणीवर अनोळखी व्यक्तीने जीवघेणा हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणाचाही अहवाल रुपाली चाकणकर यांनी मागवला आहे.

'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.