Mamata Banerjee in Maharashtra: उद्धव ठाकरे लवकर बरे होण्याची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; ममतादीदी म्हणाल्या; जय मराठा, जय बांग्ला

ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. मुंबईत पोहोचताच त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Mamata Banerjee in Maharashtra: उद्धव ठाकरे लवकर बरे होण्याची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; ममतादीदी म्हणाल्या; जय मराठा, जय बांग्ला
Mamata Banerjee in Mumbai
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 7:26 PM

मुंबईः ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत (Mumbai) आल्या आहेत. मुंबईत पोहोचताच त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे असं म्हणत ‘जय मराठा, जय बांग्ला’ नारा ममता बॅनर्जींनी दिला. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते. मी मंदिर समितीचे, ट्रस्टीचे, पंडित, गुरुजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो, असंही त्या म्हणाल्या.

ममता यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर, शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली आहे. त्या म्हणाल्या की तुकाराम ओंबळे यांनी जे देशासाठी काम केलं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी इथे आले आहे. यानंतर आज संध्याकाळीच त्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (meeting with Aaditya Thackeray and Sanjay Raut) यांची भेट घेणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.

उद्या शरद पवारांसोबत बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या प्रकृतीमुळे भेटणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घोणार आहे. शरद पवार यांची देखील मी भेट घेणार आहे, त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. त्या म्हणाल्या, “मला जो संदश द्यायचा आहे, तो मी देईन. मुंबईला येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी गेले नाही असं शक्य नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्या घरी उद्या जाणार आहे”, ममता म्हणाल्या.

दरम्यान, संजय राऊत यांनी आज दुपारी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. पण आरोग्यासंबंधी काही बंधनांमुळे उद्धव ठाकरे यांची भेट होत नाहीत. अशावेळी मी आणि आदित्य ठाकरे संध्याकाळी साडे सात वाजता ममताजी हॉटेल ड्रायडंट येथे भेटणार आहेत’, असं ट्विट राऊत यांनी केलंय.

दौऱ्याचं राजकीय महत्तव

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 1 डिसेंबरपर्यंत मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्यासाठी मुंबईत आल्याचं जाहीर केलं आहे.  या दौऱ्यावेळी त्या राज्यातील उद्योगपतींच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती मिळतेय. उद्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेणार आहेत. तर उद्या दुपारी चार वाजता त्यांची मुंबईतील उद्योगपतींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिच्या लग्नाच्या रिसेप्शनलाही त्या उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोवा राज्य निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने जोरदार प्रचार सुरू केला आहे. गोव्यात पक्षाचा विस्तार केल्यानंतर ममता बॅनर्जी आपल्या पक्षाचा महाराष्ट्रातही विस्तार करणार का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. की त्या महाविकास आघाडी सरकारला आपला पाठिंबा जाहीर करणार. शिवसेनेने ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाचे नेहमीच कौतुक केले आहे आणि पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात त्यांना पाठिंबा दिला आहे होता.

इतर बातम्या

2024 ला भाजप स्वबळावर सत्तेत येणार’, देवेंद्र फडणवसींच्या दाव्याची नवाब मलिकांकडून खिल्ली

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख, अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.