मराठा आरक्षण प्रकरणात मोठी अपडेट, याचिकाकर्त्यांचा मोठा आरोप, ‘या’ मुद्द्याकडे महाराष्ट्राचं लक्ष

मराठा आरक्षण प्रकरणावर मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या अहवालाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांनी मोठे आरोप केले.

मराठा आरक्षण प्रकरणात मोठी अपडेट, याचिकाकर्त्यांचा मोठा आरोप, 'या' मुद्द्याकडे महाराष्ट्राचं लक्ष
मराठा आरक्षण
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 6:08 PM

मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली. राज्य मागास प्रवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षणाप्रमाणेच मराठा समाजातील तरूणांना सरकारी नोकरीत आरक्षणाची गरज दाखवणारे आकडे दिशाभूल करणारे असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. अहवालात सादर केलेली आकडेवारी संभ्रम निर्माण करणारी असल्याचा जेष्ठ कायदेतज्ज्ञ प्रदीप संचेती यांनी दावा केला. आयोगानं दाखवलेली मराठा समाजाची कमी आकडेवारी आणि टक्केवारी विश्वासार्ह नसल्याचा दावा विरोधकांनी केला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.

मराठा आरक्षणाच्या आजच्या सुनावणीत देखील याचिकाकर्त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर पुन्हा एकदा आक्षेप घेतला. “मराठा समाजातील आत्महत्येची आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. कर्जबाजारीपणामुळे मराठा समाजात आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचा दावा चुकीचा आहे. आत्महत्येचे वाढीव प्रमाण दाखवून असाधारण परिस्थिती असल्याचा आयोगाच्या अहवालात दिखावा आहे”, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून युक्तिवाद करताना करण्यात आला. राज्य मागासवर्ग आयोगाने कुठलेच ठोस आधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.

26 ऑगस्टला पुढील सुनावणी

याचिकाकर्त्यंच्या युक्तिवादानंतर आजची सुनावणी पूर्ण झाली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ही 26 ऑगस्टला होईल, असं कोर्टाने जाहीर केलं. यावेळी याचिकाकर्त्यांनी आपल्याला युक्तिवादासाठी आणखी वेळ देण्यात यावा, अशी मागणी केली. आता मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 ऑगस्टला होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादानंतर आयोगाकडून काय युक्तिवाद करण्यात येतो, ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तसेच कोर्ट काय निरीक्षण नोंदवत तेदेखील महत्त्वाचं असणार आहे.

Non Stop LIVE Update
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...