Kishori Pednekar | जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्राबाबत महापौर किशोर पेडणेकर यांची भायखळा पोलीस स्टेशनला तक्रार

सदर पत्रामध्ये महपौरांविषयी असलेला मजकूर हा अतिशय लज्जास्पद असून महिलांची विटंबना करणारा तसेच समस्त महिला वर्गाला वेदनादायी व क्लेशदायक असा आहे. सदर विषयाबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र तसेच स्थानिक भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे.

Kishori Pednekar | जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्राबाबत महापौर किशोर पेडणेकर यांची भायखळा पोलीस स्टेशनला तक्रार
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 6:48 PM

मुंबई : कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी व अश्लील भाषेतील प्राप्त पत्राची महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज, 10 डिसेंबर 2021 रोजी भायखळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. किशोरी पेडणेकर यांच्या जुन्या निवासस्थानी काल धमकीचे पत्र आले होते. या पत्रात महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. जुन्या निवासस्थानी आलेले हे पत्र आज किशोरी पेडणेकर यांच्या नवीन निवासस्थानी त्यांना मिळाले. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधला.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, काल रोजी माझ्या जुन्या निवासस्थानी आलेले पत्र मला आज प्राप्त झाले. सदर पत्र उघडले असता, माझ्या विषयी अतिशय अश्लील भाषा वापरून मला व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर पत्रामध्ये माझ्याविषयी असलेला मजकूर हा अतिशय लज्जास्पद असून महिलांची विटंबना करणारा तसेच माझ्यासहित समस्त महिला वर्गाला वेदनादायी व क्लेशदायक असा आहे. सदर विषयाबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र तसेच स्थानिक भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे.

स्वतःला व कुटुंबाला विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी

सदर पत्रावर विजेंद्र म्हात्रे असे नाव नमूद करण्यात आले आहे. मागील दोन-तीन दिवसातील घडामोडींचा विचार करता व प्राप्त पत्रातील मजकूर लक्षात घेता सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माननीय गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांना दिलेल्या पत्रात नमूद केली आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबीयांना त्वरित विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी या पत्राद्वारे महापौरांनी केली आहे.

दरम्यान किशोरी पेडणेकर यांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे. याआधी फोन कॉलद्वारे धमकी आली होती. त्यानंतर आता पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

(Mayor Kishor Pednekar lodges complaint with Byculla Police Station regarding death threat letter)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.