अंबरनाथमध्ये मेफोड्रॉन एम.डी अमली पदार्थ जप्त, एक आरोपी अटक तर एक फरार

या कारवाईत पोलिसांनी एका तरुणास अटक केली असून यावेळी त्याचा आणखी एक साथीदार पोलिसांच्या तावडीतून निसटला.

अंबरनाथमध्ये मेफोड्रॉन एम.डी अमली पदार्थ जप्त, एक आरोपी अटक तर एक फरार
अटक
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 10:05 PM

अंबरनाथ : राज्य शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे ठाणे पोलिसांनी येत्या 5 जानेवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला असून पार्ट्या करणाऱ्यांवर देखील करडी नजर असणार आहे. तसेच अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवरदेखील करडी नजर आहे. अशात अंबरनाथमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफोड्रॉन एम.डी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका तरुणास अटक केली असून यावेळी त्याचा आणखी एक साथीदार पोलिसांच्या तावडीतून निसटला. (Mephodron MD seized in Ambernath one arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, बबलू उर्फ विवेक मोरे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा साथीदार संजय गायकवाड फरार आहे अशा माहिती अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अलर्ट ऑपरेशन करण्यात आले होते. सदर अलर्ट ऑपरेशन दरम्यान वेगवेगळ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आले होते.

हे पथक गस्तीवर असताना रेल्वे स्टेशनजवळील भीमनगर भागात एका रिक्षात दोन तरुण संशयितरित्या बसले होते. पोलीसानी त्यांना हटकले असता या दोघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पुन्हा ताब्यात घेतले. यामधील एकाची चौकशी सुरू केली असता एका तरुणाचे नाव बबलू उर्फ विवेक मोरे असल्याचे समोर आले. त्याच्या चौकशी दरम्यान त्याचा साथीदार संजय गायकवाड मात्र फरार झाला.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी बबलूची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मेफोड्रॉन एम.डी या अमली पदार्थाची अकरा पाकिटं असा एक लाख सत्तावन हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुद्देमालात एक रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. या आरोपीवर अमली पदार्थ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मेफोड्रॉन एम.डी हा अमली पदार्थ या आरोपीने कुठून आणला याचा शोध शिवाजी नगर पोलीस घेत आहेत. (Mephodron MD seized in Ambernath one arrested)

इतर बातम्या – 

मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनचे नमते; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

Dharavi Corona Update : 8 महिन्यांनी धारावीत चैतन्य, 24 तासात एकही नवा रुग्ण नाही

(Mephodron MD seized in Ambernath one arrested)

एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.